मुंबई - गृह खात्याकडून 37 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या होत्या. याबाबतचा निर्णय गृहखात्याने घेतल्यानंतर बारा तासाच्या आतच 37 अधिकाऱ्यांपैकी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्यांना गृह खात्याकडून स्थगिती देण्यात आली आहे. स्थगिती देण्यात आलेले अधिकारी मुंबई आणि ठाण्यामधील आहेत.
![पाच अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढत्यांना स्थगिती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-hm-7209727_21042022100433_2104f_1650515673_227.jpg)
गृहखात्याचा अजब कारभार - मुंबई आणि ठाण्यात पाच-सहा आयुक्तांना बढती देण्यात आली होती. मात्र पाच अधिकाऱ्यांच्या भरतीला गृहखात्याने स्थगिती दिली असून याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. गृह खात्याकडून आदेश जारी केल्यानंतर गृहखात्याच्या अजब कारभारावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. राजेंद्र माने, संजय जाधव, महेश पाटील, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे या पाच अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्त पदी बढती देण्यात आली होती. मात्र आता या पाचही अधिकाऱ्यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे.