मुंबई - मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यात गृहमंत्र्यांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी सुमारे दीड तास बैठक पार पडली. बैठकीत आतापर्यंतच्या तपासात काय निष्पन्न झाले? तपासाची पुढील दिशा काय असणार? यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
हेही वाचा - अमरावतीत लॉकडाऊन शिथिल; सर्व दुकाने उघडली, भीती मात्र कायम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाच्या रहस्यमय मृत्यूने खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरात आढळून आला. अंगावर कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यांचंही शवविच्छेदन अहवालातही शरीराच्या कोणत्याही अवयवांना दुखापत झालेली नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
हेही वाचा - मनसुख यांचा शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांनी नाकारला; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शासकीय ज्ञानेश्वरी बंगल्यावर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, तसेच मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.
एएनआयकडे तपास सोपवा
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एएनआयकडे सोपवावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार
मृत्यचे कारण गुलदस्त्यात
मृत्यूचे नेमकं कारण केमिकल अॅनासिसिसनंतर कारण समोर येणार आहे. त्यांचा मृत्यू बुडून झाला की हा घातपात हे केमिकल अॅनासिसिसमधून स्पष्ट होईल. मनसुख हिरेन यांच्या चेहऱ्यावरील जखमांवरुन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे प्राथमिक कारण समोर येईल अशी अपेक्षा होती. परंतु मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.