ETV Bharat / city

नोटाबंदीचे धोरण चुकलेच, रिझर्व बँकेच्या हवाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आरोप - Dilip Walse Patils allegation on Modi

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. बनावट नोटा मुख्यमंत्री बदलाची चर्चा तसेच दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले.

नोटाबंदीचे धोरण चुकलेच, रिझर्व बँकेच्या हवाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आरोप

author img

By

Published : May 31, 2022, 12:19 PM IST

मुंबई - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. बनावट नोटा मुख्यमंत्री बदलाची चर्चा तसेच दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले.

बनावट नोटा झाल्या जास्त - नोटाबंदी केली होती. त्यामध्ये नोटाबंदी करण्यासाठी महागाईचे देखील कारण देण्यात आले होत. बेकायदेशीर व्यवसायाबाबत देखील एक भूमिका मांडण्यात आली होती. मात्र आता बनावट नोटा अधिक असल्याचे स्वतः रिझर्व बँक जर सांगत असेल तर नोटाबंदीचा धोरणात मोठी चूक होती, हेच लक्षात येतं. त्यामुळे कोठे धोरण फसलं याबाबतीत केंद्र सरकारने देखील भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे पाटील म्हणाले. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असणे हे भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारे आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा सपशेल पराभव यातून दिसतोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करून देशातील जनतेला केंद्र सरकारने माहिती देणे गरजेचे आहे. तसेच पुढे या बनावट नोटा नियंत्रीत करण्यासाठी भारत सरकारकडे काय योजना आहे हे देखील स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री बदलाची चर्चा नाही - मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा महाविकास आघाडीमध्ये नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे पाच वर्षाकरीताचे पूर्ण काळ मुख्यमंत्री म्हणून राहतील. याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील याबाबत सातत्याने महाविकास आघाडीने सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाबाबतचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही.

दीपाली सय्यद यांनी संयम राखावा - भारतीय जनता पक्षाच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मात्र दोषी आढळल्यास सर्वांवरच कारवाई केली जाईल. विशिष्ट लोकांवरच कारवाई होते असं म्हणणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यावर पाटील यानी दिली आहे. बोलताना मर्यादा या पाळण्यात आल्या पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे. पुरुष किंवा महिला कार्यकर्त्याने मर्यादांचा भंग करू नये आपल्या संस्कृतीप्रमाणे मर्यादेत राहूनच प्रत्येक विषयात बोललो पाहिजे अशी सूचनाही गृहमंत्र्यांनी केली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.