ETV Bharat / city

Dilip Walse Patil : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं इतकं सोपं नाही, इथं कायद्याचं राज्य : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातील राजकीय परिस्थितीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत ( BJP Demands Presidential Rule In Maharashtra ) आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपच्या मागणीवर उत्तर दिले ( Dilip Walse Patil Replied Pravin Darekar ) आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, इथं राष्ट्रपती राजवट लावणे सोपं नाही, अशा शब्दात वळसे पाटील यांनी भाजपला डिवचले ( Walse Patil On Presidential Rule Demand ) आहे.

HM Dilip Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Apr 23, 2022, 4:50 PM IST

मुंबई : कोरोना काळात मंदिरे उघडण्याचा मुद्दा, त्रिपुरा राज्यात घडलेली घटना, किंवा लाऊडस्पीकर सारखा मुद्दा जाणूनबुजून बाहेर काढला जात आहे. या मुद्यावरून राज्यात दंगली घडवणे, अशांतता पसरवणे असे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. यातून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली असल्याचे चित्र निर्माण करून, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ( BJP Demands Presidential Rule In Maharashtra ) लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ( Dilip Walse Patil Replied Pravin Darekar ) केला. मात्र राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित असून, राष्ट्रपती राजवट लावणे इतके सोपे नाही, असे गृहमंत्र्यांनी यावेळी ( Walse Patil On Presidential Rule Demand ) सांगितले.

राणांच्या घरावर हल्ला नाही : राणा दाम्पत्याकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या खाजगी निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa At Matoshree ) करणार असल्याचे वक्तव्य सातत्याने केले जात आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या चौकटीत राहून कोणतेही वक्तव्य केले पाहिजे. समाजात तडे निर्माण होतील, असे वर्तन योग्य नाही. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही वेळा अशी वक्तव्य केली जात आहेत. यासंबंधी पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. आज दुपारी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संकेत दिले. तसेच तसेच राणा दाम्पत्याच्या अमरावतीतील घरावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला असल्याचा आरोप केला ( Attack On Rana Home Amaravati ) जातोय. मात्र असा कोणताही हल्ला राणा दाम्पत्याच्या घरावर झाला नसल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राणा दाम्पत्यावर कारवाई होणार : मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून राणा दाम्पत्यांना पोलिसांनी नोटिस दिली होती. मात्र तरीही मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला होता. त्यामुळे राणा दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच मुंबई आणि राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस सक्षमपणे करत असल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

लाऊडस्पीकर मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक : लाऊडस्पीकर मुद्द्यावर सोमवारी 25 एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली ( Meeting Over Loudspeaker Issue ) आहे. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) हे देखील उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर राज्य सरकारला तीन मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी पोलीस सज्ज : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर ( PM Narendra Modi Mumbai Tour ) आहेत. पंतप्रधानांचा मुंबई दौरा सुरक्षित व्हावा यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Presidential Rule Maharashtra : राष्ट्रपती राजवट लावण्यावरून भाजपात पडले दोन गट.. दरेकरांकडून मागणी, शेलारांचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.