ETV Bharat / city

Home Isolation New Guideline : होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक नियमात बदल - गृह विलगीकरणाचे नियम

केंद्र सरकारने होम आयसोलेशनबाबत मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल ( Home Isolation New Guideline ) केला आहे. कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवावे असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे.

Home Isolation New Guideline
मुंबई पालिका
author img

By

Published : Jan 8, 2022, 6:10 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने होम आयसोलेशनबाबत मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल ( Home Isolation New Guideline ) केला आहे. कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवावे असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे.

होम आयसोलेशन -

डिसेंबर पासून देशभरात कोरोना व ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच घरच्या घरीच चार ते पाच दिवसात रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी रुग्णालयावर ताण येऊ नये म्हणून केंद्र सरकारने होम आयसोलेशनच्या नियमात बदल केले आहेत. मुंबईत रोज २० हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तर १ ते २ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज भासत आहे. तसेच मुंबईतही रुग्ण ४ ते ५ दिवसात घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लक्षणे असूनही कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.

हे राहू शकतात गृह विलगिकरणात -

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णाला गृह विलगीकरणात राहता येणार आहे. त्यासाठी घरात विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली असणे गरजेचे आहे. तसेच जेष्ठ नागरिक, दीर्घकालीन व्याधी असलेल्या रुग्णांना डॉक्टरमार्फत तपासणी केल्यानंतरच गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. एचआयव्ही बाधित, कर्करोगग्रस्तांना, प्रसुतीसाठी दोन आठवड्याचा कालावधी असलेल्या गर्भवती महिलांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी -

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने घरातील इतर व्यक्तीपासून वेगळे राहावे. मात्र घरात वेगळी सोय नसल्यास पालिकेच्या विलगीकरण केंद्रात राहावे लागणार आहे.गृहविलगीकरणात असताना सौम्य लक्षण बाधित रुग्णांचा चार औषधांच्या डोसमध्ये ताप न उतरल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी. स्वत: औषध ठरवून न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी. यात स्टराईडसारखी औषधे टाळावी. रुग्णांची नियमित तपासणी करुन त्याबाबत नोंद ठेवणेही बंधनकारक आहे. सीटी स्कॅन, रक्त चाचणीबाबत स्वत: निर्णय घेऊ नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या चाचण्या कराव्यात अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

मास्क, पिवळ्या पिशवीचा वापर -

कोरोना बाधित आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने त्रिस्तरीय मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क, टिश्‍यू पेपर, ग्लोज तसेच बाधित व्यक्तीच्या वापरातील इतर वस्तू थेट कचऱ्यात न टाकता ते किमान ७२ तास कागदी पिशवीत ठेवाव्यात. कचऱ्यात टाकताना पिवळ्या पिशवीचा वापर करावा.

हेही वाचा - Covid In Mumbai : मुंबईत पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये ८० टक्के बेड रिक्त.. खासगी रुग्णालयात गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.