ETV Bharat / city

Hindustani Bhau Police Custody : 'हिंदुस्थानी भाऊ'ला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - दहावी बारावी विद्यार्थी आंदोलन

हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला आणखी एक दिवसाची म्हणजेच 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली होती.

Hindustani Bhau
हिंदुस्थानी भाऊ
author img

By

Published : Feb 4, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 4, 2022, 5:33 PM IST

मुंबई - दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला आणखी एक दिवसाची म्हणजेच 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. तसेच झालेल्या नुकसानाबाबत पाठकने न्यायालयात माफी मागितली असल्याचे वकील महेश मुळ्येंनी यांनी सांगितले.

विकास पाठकला पोलीस कोठडी
  • परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत केले होते आंदोलन -

सोमवारी राज्यभरात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. धारावी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर धारावी पोलिसांनी त्याला अटक केली.

  • लाखो विद्यार्थी उतरले होते रस्त्यावर -

कोरोनामुळे (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाइन होत आहेत. मग परीक्षा ऑफलाइन कशासाठी? असे म्हणत सोमवारी दहावी-बारावीचे लाखो विद्यार्थी राज्यभरात रस्त्यावर उतरले (Student Protest For Online Exam ) होते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली होती

Last Updated : Feb 4, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.