मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना त्याच बरोबर पोलिसांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. तर त्यांना या संदर्भात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. मात्र या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती भारती डांगरे समोर या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले आहे की चौकशीदरम्यान किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या(Neil Somaiya) यांना अटक झाल्यास 50 हजाराच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने कायम ठेवला आहे.
काय आहे प्रकरण :शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले आहेत. तर किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांतवरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरीट सोमैया आणि त्यांचे सुपुत्र निल सोमय्या यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी सोमय्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करत न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर किरीट आणि त्यांचा मुलगा नील सोमेया यांनी मुंबई उच्च न्यायाल्यात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना अंतरिम जामीन दिला होता. सोमय्या यांच्या विरोधात या प्रकरणी मुंबईच्या ट्रॉमबे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा: Kiriti Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा
Mumbai High Court: भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - संजय राऊत
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात दिलासा कायम ठेवला आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.