ETV Bharat / city

नवी मुंबईत तब्बल १३२० कोटी रुपये किमतीचं हेरॉइन जप्त - Iran

हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील 'किला इस्लाम' येथून आला असल्याची माहिती समोर येत आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता.

Heroine imported from afganistan worth rupees 1320 crore seized
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:09 AM IST

पनवेल - समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना अनेक दिवसांपासून होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने कारवाई करत, तब्बल 1320 रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जेएनपीटी बंदरामध्ये ही कारवाई करण्यात आली.

Heroine imported from afganistan worth rupees 1320 crore seized in panvel
तब्बल १३२० कोटी रुपये किमतीचं हेरॉइन जप्त!

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान इथून हेरॉईनने भरलेला कंटेनर जेएनपीटीमध्ये उतरवण्यात आला. पोलिसांनी यावेळी जेएनपीटी कस्टम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सहाय्याने या कंटेनरची माहिती मिळविली. दरम्यान, हा कंटेनर पनवेलमधील एका गोदामात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाली. त्यांनी तातडीने याठिकाणी छापा टाकून हे अंमली पदार्थ जप्त केले.

पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक दिल्लीत राहणारा आहे तर दुसरा आरोपी हा अफगाणिस्तानमधील कंधारचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील 'किला इस्लाम' येथून आला असल्याची माहिती समोर येत आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे यावेळी घटनास्थळी दाखल होते.

Intro:सोबत फोटो जोडले आहेत.
पनवेल

पनवेलमधून कोट्यवधी रुपयांचा हेरॉइनचा साठा जप्त केलाय. हेरॉइनचा हा साठा अफगाणिस्तानहून ईराण आणि त्यानंतर समुद्राच्या मार्गे जेएनपीटी मध्ये आणण्यात आला होता. या हेरॉइनची किंमत तब्बल १३२० कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलीस जेएनपीटी मध्ये दाखल झाली आहे.
Body:समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती अनेक दिवसांपासून होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत मोठ्या शिताफीने ही कारवाई केलीये. या तस्करीचा संबंध थेट अफगाणिस्तानशी असल्याच आढळून आलं. अफगाणिस्तान इथून हेरॉईनने भरलेला कंटेनर जेएनपीटीमध्ये उतरवण्यात आला. पोलिसांनी यावेळी जेएनपीटी कस्टम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सहाय्याने या कंटेनरची माहिती मिळविली. दरम्यान, हा कंटेनर पनवेलमधील एका गोदामात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाल्यानंतर त्यांना याठिकाणी छापा टाकून हे अमली पदार्थ जप्त केले. यावेळी 1320 कोटी रुपयांच हेरॉइन २६० गोण्यांमध्ये भरलेलं होतं आणि या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये होत्या.
Conclusion:दोन आरोपींना अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी दिल्लीत राहणारा आहे तर दुसरा आरोपी हा कंधार, अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती समोर येत आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.