ETV Bharat / city

Helmet compulsory in Mumbai : 10 जून पासून मुंबईत रायडर्स आणि सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती

author img

By

Published : Jun 7, 2022, 11:12 AM IST

मुंबईत बाईकवर प्रवास करणाऱ्या रायडरसह (Helmets mandatory for riders) मागे बसणाऱ्याला व्यक्तीला देखील हेल्मेट (Helmet compulsory in passengers) घालने सक्तीची असणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेले नवीन परिपत्रकाची अंमलबजावणी 10 जून पासून करण्यात येणार.

हेल्मेट सक्ती
Helmet compulsory

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावर बाईक स्वार यांच्याकरिता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बाईकवर प्रवास करणाऱ्या रायडरसह मागे बसणाऱ्याला व्यक्तीला देखील हेल्मेट घालने सक्तीची असणार आहे . मुंबई वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आलेले नवीन परिपत्रकाची अंमलबजावणी 10 जून पासून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिलेले आहे. तसेच हेल्मेटसक्तीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही (riders follow rules helmet) त्यांनी या वेळी मुंबईकरांना केले.

10 जून पासून अंमलवजावणी : मुंबई वाहतूक पोलिसांकडून 25 मे रोजी परिपत्रक काढण्यात आले होते, त्याची अंमलबजावणी 10 जून पासून सुरू होणार आहे. या परिपत्रक म्हटले आहे की, विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहन कायद्यानुसार 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल मुंबईचे पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले.

विना हेल्मेट आढळल्यास दंडात्मक कारवाई : नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुचाकीस्वारांना आणि सहप्रवाशाला हेल्मेटसक्ती करण्याचे पत्रक वाहतूक पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी 25 मे रोजी काढले होते. 15 दिवसांनंतर अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवासी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आणि 3 महिन्यांसाठी चालक परवाना निलंबित करण्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.

वाहतूक पोलिसांचा आदेश : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई (Strict action against riders) करण्यात येणार आहे. तसेच तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता हेल्मेट घालून घराबाहेर पडावे लागणार आहे. हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

2,446 जणांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव : मुंबई वाहतूक पोलिसांनी 6 एप्रिलपासून सुरू केलेल्या विनाहेल्मेट विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून दुचाकी चालवणाऱ्या 2,446 जणांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव (Proposal to suspend licenses) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यात चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध 2,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर, 200 वाहनचालकांना अनावश्यक हॉर्न वाजवल्याबद्दल प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

हेही वाचा- कुपवाडा जम्मू काश्मीरच्या चकतरा कंडी क्षेत्रामध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.