मुंबई - मुंबईत सकाळपासूनच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मध्य रात्री बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ आता शमले आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर गुलाब चक्रीवादळ धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होऊन चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.
हे ही वाचा -VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नगर, पुणे येथे ऑरेंज अलर्ट आणि सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम येथे येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.