ETV Bharat / city

Heavy rain in Mumbai : मुंबईत मुसळधार पाऊस; सखल भागात साचले पाणी, वाहतूक मंदावली - मुंबई येथे पावसामुळे पाणी साचले

मुंबईत काल रात्री मुसळधार पाऊस ( Heavy rain in Mumbai ) पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, त्यानुसार काल सायंकाळपासून पावसाचा जोर ( Stagnant water in low laying areas in Mumbai ) वाढला. मुंबईत मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. पाहटे पावसाने ( Mumbai rain news ) विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली होती. रेल्वे उशिरा धावत होत्या, यामुळे नागरिकांना आणि चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला.

Watterlogging in Mumbai areas due to rain
मुसळधार पाऊस मुंबई
author img

By

Published : Jul 5, 2022, 8:40 AM IST

Updated : Jul 5, 2022, 11:45 AM IST

मुंबई - मुंबईला ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला ( Heavy rain in Mumbai ) आहे, तसेच रात्रीच मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. मात्र, पाहटे पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना ( Stagnant water in low laying areas in Mumbai ) दिलासा मिळाला आहे. मुंबईत २९ जूनपासून पावसाने जोर धरला. २ जुलै पर्यंत सतत पाऊस पडत होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. काल सोमवार ४ जुलै सायंकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत मुसळधार ( Mumbai rain news ) पाऊस पडला. यामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. मात्र, पहाटे ६ वाजता पावसाने विश्रांती घेतली. यामुळे सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ लागला आहे.

मुंबईत पाऊस पडल्याने रस्त्यावर पाणी

हेही वाचा - Aditya Thackeray Vs MLA Prakash Surve : आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदार प्रकाश सुर्वेंना झापले!

रस्ते वाहतूक मंदावली - मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, सायन, मिलन सबवे, बोरिवली आदी सखल भागात पाणी साचले होते. पाऊस कमी झाल्यावर काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत आहे. दरम्यान पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे, तर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

इतका पडला पाऊस - ४ जुलै सकाळी ८ ते ५ जुलै सकाळी ८ पर्यंत गेल्या २४ तासांत मुंबई शहर विभागात ९५.८१ मिलिमीटर, पूर्व उपनगर ११५.०९ मिलिमीटर, तर पश्चिम उपनगर ११६.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी ४.१० वाजता समुद्राला ४.१ मीटरची भरती असून नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे पालिकेने आवाहन केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, अशी माहिती पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

पावसामुळे चाकरमान्यांना त्रास - गेल्या काही दिवसांपासून रिपरिप करणारा पाऊस सोमवारी रात्री दमदार कोसळला. कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी चांगलेच झोडपले. रात्रभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुंबईकरांचे यात मोठे हाल झाले. जून महिन्यात दडी मारलेला पाऊस मागील चार दिवसांपासून अधूनमधून जोरधार कोसळत होता. सोमवारी संध्याकाळपासून पावसाने जोर धरला. संध्याकाळी साडेपाचनंतर धुवाधार पाऊस कोसळण्यास सुरुवात केल्याने घरी परतणाऱ्या मुंबईकरांची ट्रेन, बस पकडण्यासाठी धावपळ उडाली. रात्रभर पावसाची मुसळधार सुरू होती. दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअरपरळ, सायन, धारावी, वांद्रे, कुर्ला, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरीवली, गोरेगाव आदी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. काही भागात वाहतूक इतरत्र मार्गावर वळवण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक ठप्प - पावसाची संततधार कायम असल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावर १५ ते २० मिनिटे रेल्वे उशिराने धावत होत्या. रस्ते वाहतूक ठप्प त्यात रेल्वे वाहतूकही उशिरा धावत असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल येथे पाणी भरल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. सखल भागात साचलेल्या पाण्यातून चालत चालत अनेकांनी रेल्वे, बसेस व खासगी वाहनांनी कार्यालय गाठले. तर काहींना रस्ते वाहतुकीच्या कोंडीत तासनतास अडकल्याने ऑफिसला पोहचायला उशीर झाला.

राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली - राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या, शहर आपत्ती पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई व शहर उपनगरांत पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.

हेही वाचा - Bhaskar Jadhav To CM : शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे यावे! मुख्यमंत्र्यांना भास्कर जाधवांचे आवाहन

Last Updated : Jul 5, 2022, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.