मुंबई - पुढील 24 तासांत अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, घाट विभाग, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील 24 तासांत मुंबईत 70 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली. नंदुरबार, धुळे या ठिकाणीही तीव्र पावसाचा अंदाज आहे. राज्यभर ढगाळ वातावरण असून मुंबई शहर आणि उपनगरात अति मुसळधार पाऊस असणार आहे. 45 ते 55 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. समुद्रात संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी भरती असून ती 3.12 मीटर पर्यंत असेल मागील 24 तासांत कुलाबा येथे 17.8 मिमी तर सांताक्रूझ 42 मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाचा अंदाज
१३-१४ ऑगस्ट: कोकण गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..
१५-१६ ऑगस्टः कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..
एकूण हवामानाचा अंदाज
१३ ऑगस्ट: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१४ ऑगस्ट: कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१५ ऑगस्टः कोकण गोव्यात काही भागांत जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१६ ऑगस्ट: कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.