ETV Bharat / city

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला कोणाला परवानगी? उच्च न्यायालयात आज सुनावणी - उच्च न्यायालय

शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी देण्यात यावी, यासाठी ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली (Hearing on Shivsena Dasara Melava) होती. अगोदर परवानगी मागूनही पालिकेनं अजून निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, हायकोर्टात (Bombay High Court) आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

Hearing on  Shivsena Dasara Melava in High Court  today
शिवसेना दसरा मेळाव्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी
author img

By

Published : Sep 22, 2022, 9:26 AM IST

Updated : Sep 22, 2022, 9:54 AM IST

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळावाकरिता शिवाजी पार्कवर अद्यापही मुंबई महानगरपालिकेकडून पंधरा दिवसांपासून मंजुरीकरिता दिलेला अर्ज अद्यापही मंजूर न केल्याने अखेर शिवसेनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी धाव घेण्यात आली होती. या याचीकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज ऐकायला येणार ? हे स्पष्ट होण्याची शक्यता (Hearing on Shivsena Dasara Melava in High Court) आहे.

दसरा मेळावा आज सुनावणी - मात्र मुंबई महानगरपालिकेकडून अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. अखेर जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेनेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष (Shivsena Dasara Melava in High Court today) लागलंय.

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी बुधवारी हायकोर्टात धाव घेतली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी म्हणजेच आज सुनावणी पार पडेल. या याचिकेद्वारे शिवसेनेनं आता दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा, यासाठी अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. हायकोर्टानेही जर परवानगी नाकारली तर शिवाजी पार्कवर घुसून दसरा मेळावा करु, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने याआधीच देण्यात आला होता.

बुधवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा उल्लेख केला. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं? दसरा मेळाव्यासाठी हायकोर्ट शिवसेनेला परवानगी देतं की नाकारतं ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदेंच्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळले - 1966 सालापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा दरवर्षी घेतला जातो आहे. महापालिकेने ही दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगीही दिल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे दसरा मेळाव्यावरुन राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण (Shivsena Dasara Melava) झालाय.

सध्या बीएमसीवर प्रशासकाच्या नेतृत्त्वाखाली कामकाज सुरु आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात बीएमसीकडून शिवसेनेला सहजासहजी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणं कठीण असल्याचं जाणकारांकडून सांगितलं जात होतं. आता नेमकं तेच पाहायला मिळतंय.

शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये संघर्ष तीव्र होण्याच्या मार्गावर - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगाव येथील नोस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखांशच्या मेळाव्यात म्हटले होते, की दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावरच होणार असे ठामपणे सांगितल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलेच टाकताना दिसण्याचे चिन्ह आहे. मात्र त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. खरी शिवसेना कोणाची ? हे अद्याप सर्वोच्च न्यायालयात (Bombay High Court) न्यायप्रविष्ठ असताना मात्र राज्यात दोन्ही गटांमध्ये संघर्ष टोकाला जाताना दिसत आहे.

Last Updated : Sep 22, 2022, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.