मुंबई - पत्राचाळ घोटाळ प्रकरणी शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहेत. त्यांनी जामीनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज सुनवाई होण्याची शक्याता आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली आहे. संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये असे म्हटले आहे की माझ्यावर ईडीने केलेली कारवाई (Sanjay Raut accused ED) ही राजकीय सूडबुद्धीचे उत्तम उदाहरण आहे. यावर 16 सप्टेंबर पर्यंत ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी दिले होते.
सुडबुद्धीचे राजकारण - संजय राऊत यांनी अर्जात पुढे असे म्हटले होते की, मी निर्दोष आहे. संजय राऊत गुरु आशिष कन्स्ट्रक्शन एचडीआयएल पत्रा चाळशी कुठेही जोडलेले नाहीत असे जामीन अर्जात म्हटले होते. शिवसेना नेत्यावरील खटला हा सत्तेचा गैरवापर तसेच राजकीय सूडबुद्धीचे एक उत्तम उदाहरण आहे (ED is a good example of political vendetta). सत्ताधारी पक्षाला तोंड देत असलेल्या विरोधकांना जबरदस्तीने चिरडून टाकण्यासाठी त्यांचा बळी घेतला जात असल्याता आरोप याचिकेत करण्यात आला होता.
राउतांच्या पत्नीवर गंभीर आरोप- राज्यसभा सदस्यावर संजय राऊत यांच्या पत्नी, इतर दोन विकासकांकडून 1.06 कोटी रुपयांची गुन्ह्याची रक्कम घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यातील 55 लाख रुपये हे प्रवीण राऊत यांच्या पत्नीचे कर्ज असून ते फेडण्यात आल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला आहे. एका विकासकाकडून 37.50 लाख रुपये मिळाले ही गुंतवणूक संजय राऊत यांनी प्रकल्पात केली होती. नंतर जमीनमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद निर्माण झाल्याने त्यांनी त्यातून बाहेर काढले. राऊत यांना मर्यादित नफा मिळाला असा दावा त्यात करण्यात आला होता.
ईडीची केस काय? - ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले, हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य, व्यावसायिकांची आहेत, ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितलं. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले.