ETV Bharat / city

पावसामुळे उच्च न्यायालयातील सर्व सुनावण्या रद्द...

author img

By

Published : Sep 23, 2020, 12:40 PM IST

Updated : Sep 23, 2020, 1:35 PM IST

सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबईच्या जनजीवनाला बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सर्व सुनावण्या रद्द करण्यात आल्या असून न्यायालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन याचिकेवर आज होणारी सुनावणी ही गुरुवारी (24 ऑक्टोबर) होणार आहे. याच दिवशी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या याचिकेवरील सुनावणीही होणार आहे.

पावसामुळे न्यायालयातील सुनावणी रद्द
पावसामुळे न्यायालयातील सुनावणी रद्द

मुंबई - कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊननंतर आता सतत पडणाऱ्या पावसाचा फटका मुंबईच्या जनजीवनाला बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सर्व सुनावण्या रद्द झाल्या असून न्यायालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. एनसीबीने अटक केलेल्या रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी गुरुवारी (24 ऑक्टोबर) होणार आहे. याच दिवशी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या याचिकेवरील सुनावणीही होणार आहे.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : जया साहाची नारकोटिक्स ब्युरो करणार सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

याबरोबरच, सुशांतसिंह प्रकरणी ड्रग्ज सिंडिकेटचा तपास करणाऱ्या एनसीबीने अटक केलेल्या शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासिथ परिहार, अनुज केशवानी, अंकुश अरनेजा, कमरजीत सिंग आनंद, संकेत पटेल, संदीप गुप्ता, आफताब अन्सारी व डेवेन फर्नांडिस यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली आहे. मात्र, पावसामुळे त्यांची न्यायालयातील सुनावणी रद्द करण्यात आली असून ही सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

मधू वर्मा मेंटेना एनसीबीसमोर हजर

बॉलिवूडमधील ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी मधू वर्मा मेंटेना यास एनसीबीच्या एसआयटीसमोरील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर मधू वर्मा आज (बुधवार) चौकशीसाठी हजर झाला आहे. रिया चक्रवर्तीसह सहा जणांच्या जामीन याचिकेवर 11 सप्टेंबरला सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने या सर्वांना जामीन नाकारत 22 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली होती.

पावसामुळे उच्च न्यायालयातील सर्व सुनावण्या रद्द...

हेही वाचा - मुंबईत मुसळधार..! रस्ते वाहतुकीवर परिणाम

Last Updated : Sep 23, 2020, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.