ETV Bharat / city

Minister Rajesh Tope - राज्यात शंभर टक्के लॉकडाऊनची गरज नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे - लॉकडाऊन गरज नाही राजेश टोपे

राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी, शंभर टक्के लॉकडाऊनची ( Minister Rajesh Tope talk on lockdown ) गरज लागणार नाही. परंतु, विषाणूला आळा घालण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्बंध आणावे लागतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Minister Rajesh Tope talk on lockdown
लॉकडाऊन राजेश टोपे प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 5, 2022, 3:47 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी, शंभर टक्के लॉकडाऊनची ( Minister Rajesh Tope talk on lockdown ) गरज लागणार नाही. परंतु, विषाणूला आळा घालण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्बंध आणावे लागतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कोरोना संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. टोपे ( Minister Rajesh Tope ) त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचे ते म्हणाले.

माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

हेही वाचा -Bulli Bai App Case : बुली बाई अ‍ॅप प्रकरणात मोठा खुलासा; 'जाट खालसा 7' टि्वटर अकांऊटचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास

जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा

आटोक्यात आलेल्या कोरोनाने राज्याची पुन्हा डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या चोवीस तासांत 18 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनचेही रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केवळ आरटीपीसीआर टेस्टच नव्हे तर, अँटिजेन टेस्टवरही भर द्यायला हवा, असा निर्णय घेण्यात आला. या टेस्टसाठी लागणारी सामग्री जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी करून त्याचा हिशोब प्रशासनाला द्यावा. किती टेस्ट पॉझिटिव्ह येतील, त्याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करण्याच्या सूचना आज दिल्याचे टोपे ( Minister Rajesh Tope ) म्हणाले.

अँटिजेन टेस्ट वाढवणार

आता कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे, रुग्णसंख्या सुमारे 30 हजारपर्यंत जाऊ शकते. आरटीपीसीआर टेस्ट केल्यास ताण येईल. त्यामुळे, रॅपिड अँटिजेन टेस्ट करणार. या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार नाही. परंतु, किऑक्सद्वारे अँटिजेन कराव्या, अशा सूचना आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच, फेविपीरावीर आणि मोलनूपिरावीर ही दोन औषधे सध्या प्रभावी ठरत आहेत. मोलनूपिरावीरची उपलब्धता नाही. त्यामुळे, ती वाढविण्यासाठी केंद्राला विनंती केल्याचे टोपे यांनी सांगितले.

शंभर टक्के लॉकडाऊन नाही

लॉकडॉऊनबाबत केंद्र सरकारने आर्ग्युमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द प्रयोग केला आहे. त्यामुळे, लॉकडाऊन शब्द आता वापरता येणार नाही. नॉन इसेन्शियल ॲक्टिव्हिटी तपासावी लागणार आहे. तसेच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी शंभर टक्के लॉकडाऊन लावावा लागेल, असे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंध कठोर करावे लागतील, असे टोपे म्हणाले. क्वारंटाईन कालावधी सात दिवसांचा केला आहे. तसेच, लसीकरणवर भर दिला असून ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगून लसीकरण केले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

नियमांचे पालन करा

कोरोना आणि ओमायक्रॉनचा राज्यात प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत ओमायक्रॉनची संख्या 553 झाली आहे. तर, कोरोनाचे 18 हजार 466 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 66 हजार 308 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत. जवळपास 70 आमदार आणि दहा मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्वांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाला देखील नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्याचे टोपे म्हणाले.

हेही वाचा - Sindhutai Sapkal Passes Away : अनाथांच्या मायेनं व्यापलेलं ममत्व अनंताच्या प्रवासाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.