ETV Bharat / city

Minister Rajesh Tope : कोरोनाचे सावट असले तरी वारी होणारच; आरोग्यमंत्र्यांची माहिती - आषाढी वारी 2022

कोरोनाबाबतची काळजी घेऊन आषाढी वारी ( Ashadi Wari 2022 ) पार पाडली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. आज ( सोमवारी ) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet Meeting ) दिंडी तसेच त्याच्या आयोजनाबाबत देखील चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय बैठकीत कोरोना खबरदारीबाबत चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Minister Rajesh Tope
Minister Rajesh Tope
author img

By

Published : Jun 6, 2022, 7:39 PM IST

मुंबई - काही दिवसांतच वारीला सुरुवात होणार आहे. यात जवळपास दहा ते पंधरा लाख वारकरी सहभागी होतात. वारी बाबतचे आयोजनही शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र सध्या कोरोनाचे सावट पुन्हा एकदा गडद होत आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची काळजी घेऊन आषाढी वारी ( Ashadi Wari 2022 ) पार पाडली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. आज ( सोमवारी ) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet Meeting ) दिंडी तसेच त्याच्या आयोजनाबाबत देखील चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय बैठकीत कोरोना खबरदारीबाबत चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

'नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा' : मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची काही लक्षणे जाणवतच आहेत. मात्र अद्याप त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. पण राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सध्या काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आल्या असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कलाकार कोरोना पॉझिटिव्ह : निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी वाढदिवसाच्या झालेल्या पार्टी नंतर अनेक कलाकारांना कोरोना झाला असल्याचा उल्लेख आवर्जून आरोग्य मंत्र्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीत दिलेले निर्देश :

मी पांडुरंगाला विनंती करतो, यंदाचा वारीचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी पांडुरंगाला घातले होते. काल ( रविवारी ) पुण्यात ते बोलत होते.

'पालखीत लसीकरणची सुविधा करण्यात यावी' : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

'पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न' : पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - Task Force Meeting : कोरोनाबाबत राज्य सरकार अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची टास्कफोर्सची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.