ETV Bharat / city

Maharashtra Lockdown : राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार - राजेश टोपे - NCP President Sharad Pawar

तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ( Lockdown Decision ) सरकारने घेतला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले आहे. आज (गुरुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ( NCP President Sharad Pawar ) कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे ( Home Minister Dilip Walse Patil ) पाटीलही उपस्थित होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Jan 6, 2022, 3:30 PM IST

Updated : Jan 6, 2022, 3:53 PM IST

मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने ( Increased Corona Patient ) वाढत असली तरी तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय ( Lockdown Decision ) सरकारने घेतला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी सांगितले आहे. आज (गुरुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ( NCP President Sharad Pawar ) कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे ( Home Minister Dilip Walse Patil ) पाटीलही उपस्थित होते. शरद पवारांचा दररोज सर्वांशी संपर्क असतो, असेही राजेश टोपे म्हणाले. शिवाय राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबतचा ( Weekend Lockdown in The State ) निर्णय मुख्यमंत्री ( CM Uddhav Thackeray ) घेतील, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देतांना आरोग्यमंत्री

काल (बुधवारी) 26 हजारांच्या आसपास राज्यात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. उद्या कदाचित 35 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद होईल, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यासंदर्भात त्यांना अधिक माहिती घ्यायची होती. त्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सध्याची परिस्थिती, त्यावरचा उपाय आणि काय निर्बंध लादले जाऊ शकतात याबाबत चर्चा झाली असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर खासगी सेवांमुळे जर संख्या वाढत असेल, तर त्याबाबतीचे निर्बंध अधिक वाढवण्याची गरज असेल, तर ते करावे, अशा संदर्भातील चर्चा झाली असल्याचे टोपे म्हणाले.

  • राज्यात विकेंड लॉकडाऊन ?

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता विकेंड लॉकडाऊन लागणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. यावर बोलतांना या सर्व पर्यायांवर चर्चा झाल्या आहेत, मात्र विकेंड लॉकडाऊन आणि नाइट कर्फ्यू बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

  • 'मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या दररोज चर्चा'

मुख्यमंत्री आणि शरद पवार रोज चर्चा करतात. रोज सकाळी त्यांची फोनवर सविस्तर चर्चा होते. यामुळे त्यांना निर्णय घेण्यासही मदत होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अधिकची माहिती घेतली असल्याचे, राजेश टोपे यांनी सांगितले. योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि शरद पवार चर्चेतून घेतील आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करु, असेही ते म्हणाले. शिवाय लसीकरण वाढवण्यावरही शासनाचा भर असणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

  • 'लसीकरण वाढीवर भर'

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर लसीकरणावर भर द्यावा लागेल. अद्यापही 70 ते 80 लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर राज्य सरकारने नवीन नियोजन करावे, अशा सूचना शरद पवारांनी यावेळी दिल्या. तसेच रुग्णांना औषध आणि लागलेल्या निर्बंधवर देखील बैठकीत चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

  • 'लोकल ट्रेन बंद करण्याचा विचार नाही'

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र तरी, अद्याप लोकल ट्रेन बंद करण्याबाबत राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी मुंबईत लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. तसेच कुठेही जिल्हाबंदी बाबत अद्याप चर्चा नाही. मात्र मुंबईत मोठ्या प्रमाणात फ्रंट लाईन वर्कर कोरोना बाधित होत आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांचा आकडा मोठा असल्याने आरोग्यमंत्रयांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  • 'केवळ 15 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू'

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढत असला तरी, केवळ 15 टक्के रुग्णच कोविड सेंटर किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. 85 टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. सध्या 80 टक्के बेड उपलब्ध असून राज्यात ऑक्सिजनचा साठा देखील पुरेसा आहे. तसेच जीनेम सीक्वेंसीचा रिपोर्ट यायला चार ते पाच दिवस लागत असल्याने जीनेम सीक्वेंसीवर आरोग्य विभागाचा सध्या भर नाही. मात्र संक्रमित झालेल्या रुग्णांना काय करावं आणि काय करु नये याबाबत योग्य सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात असल्याचे माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

  • सार्वजनिक कार्यक्रम तसेच लग्नसमारंभात नियमांची कठोर अंमलबजावणी

सार्वजनिक कार्यक्रम तसेच लग्न समारंभामध्ये राज्य सरकारने घालून दिलेले जे निर्बंध आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. याबाबत राज्य सरकारकडून कोणती पावले उचलली गेली. तसेच रुग्णसंख्या कशा प्रकारे नियंत्रित करता येईल, याबाबत आरोग्य विभागाकडून शरद पवार यांनी यावेळी माहिती घेतली. तसेच राज्यात वाढणाऱ्या तरूणाचा प्रादुर्भावावर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज सकाळी फोन द्वारे चर्चा करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्याकडून अजूनही काही निर्णय घेतले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Mumbai Doctors Covid positive : मुंबईतील 260 निवासी डॉक्टर कोरोनाबाधित

Last Updated : Jan 6, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.