मुंबई - गेली सहा महिने एसटीचा संपाचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) आता एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले पॅनल उभे करण्याचे संकेत दिले आहेत. सदावर्ते यांनी एसटी कामागारांसाठी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना ( ST Kashtakari Jansangh organization ) केली असून त्यांनी याबाबत आज मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुणरत्न सदावर्तें यांनी केली संघटनेची घोषणा - एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण घेण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी हात काढल्यानंतर, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेऊन डंके की चोट पे म्हणत तब्बल चार महिने मोर्चा सांभाळला होता. त्यानंतर, न्यायालयाचा निर्णय आला एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश आले. मात्र, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला या प्रकरण ऍड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत निघाला. यामुळें गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. आज तर एसटी कामगारांचा हक्कासाठी आणि त्यांना न्या मिळून देण्यासाठी सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. आज मराठी पत्रकार संघात सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन या संघटनेची घोषणा केली आहे.
निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच - या पत्रकार परिषदेमध्ये बोलता असताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की,गेल्या ७० वर्षात एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. राज्यात खालच्या स्तराचे राजकारण सुरु आहे. गांधीवादाने देशाची महाराष्ट्राची फसवणूक केली. देशात गांधीवादी राजकारण्यांनी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असे गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांच्या फटका कामगारांना बसतो आहे. एसटी महामंडळात शरद पवार यांची युनियन ९२ हजार कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत होती. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून २०० रुपये घेतले जाते त्याचा हिशोब नाही. गांधी आणि कम्युनिस्ट हे दोन्ही विचार कष्टकऱ्यांसाठी फायद्याचे नाहीत. कर्मचारी हे जात आणि धर्मात विभागले आहेत. आता सर्वजण जात धर्म घरी ठेवून 95 टक्के कर्मचारी हे एसटी कष्टकरी जनसंघाचे सभासद असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर टीका देखील केली आहे. ते म्हणाले की, 'भीतीमुळे एसटी बँकेची निवडणूक घ्यायची हिंमत होत नाही. निवडणूक कधीही घेतली तरी विजय आमचाच होईल असा विश्वास गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे.
मलिकांची मंत्रिपदावरून हकालपट्टी का केली नाही ? - एसटी संपातील कर्मचाऱ्यांनावर गुन्हे दाखल झाले आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू न केल्या संदर्भात पत्रकारांचा प्रश्नावर उत्तर देताना सदावर्ते यांनी सांगितले की, कायद्याने त्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावेच लागणार आहे. तुरूंगात असलेल्या नवाब मलिकांची मंत्रिपदावरून हकालपट्टी का केली नाही ? या प्रश्नाचे उत्तर महाविकास आघाडी सरकारने द्यावे. माझे सरकारला सांगणे आहे की लवकरात लवकर अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जावे.