ETV Bharat / city

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा.. म्हणाले, 'विकासाकडे वाटचाल..' - भारतीय राज्यघटना

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांची उद्या जयंती आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांनी दिलेल्या महान राज्यघटनेच्या ( Constitution Of India ) पाठबळावरच राज्याची विकासाकडे वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्री ( CM Greets Dr Babasaheb Ambedkar Jayanti ) म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा..

author img

By

Published : Apr 13, 2022, 8:00 PM IST

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या ( Constitution Of India ) पाठबळावरच आपल्या राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा ( CM Greets Dr Babasaheb Ambedkar Jayanti ) दिल्या.

देशाला एकसंघ ठेवण्याची किमया बाबासाहेबांनी केली : डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. डॉ. आंबेडकर यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सुत्रांविषयी जागरूक राहावे लागेल, हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम धीम्या गतीने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.