मुंबई - दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये काँक्रीटचा रस्ता बनवण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांकडून केला जात होता. आज महापौरांनी शिवाजी पार्क मैदानाला भेट देऊन पाहणी केली. (concrete in Shivaji Park ground ) मैदानात कोणत्याही प्रकारचा काँक्रीटचा रस्ता बनवला जात नाही, पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी ग्रावेल्स Gravels टाकण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.
पाणी वाहुन जाण्यासाठी ग्रावेल्स -
काही दिवसापांसून सोशल मिडीयावर शिवाजी पार्कच्या मधोमध परिसरामध्ये कॅान्क्रिटचा रस्ता बनवित असल्याची चुकिची माहिती पसरवली जात आहे. येथे असे नमुद करण्यात येते की सदर रस्ता हा मातीचा (Mud Track) असून त्या खाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रावेल्स gravels टाकण्यात आले आहे. (concrete in Shivaji Park ground ) सदर पध्दत ही कुठल्याही आंतरराष्ट्रीय पध्दतीच्या मैदानामधील पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या धर्तीवर आपण संपुर्ण शिवाजी पार्कामध्ये जमीनीखाली (Perforated Pipes)चे जाळे टाकले असून पार्कातील नव्याने तयार केलेल्या ३६ विहीरीमधून गवतासाठी तसेच धुळ उडु नये यासाठी विहिरीतील पानी काढून पार्कमध्ये मारलेलं पाणी तसेच पावसाचे पाणी निचरा होऊन विहीरींना पुनश्च मिळण्यास मदत होईल असे महापौरांनी सांगितले.
स्वतंत्र कंत्राटी संस्था नेमण्यात येणार
सदर कामाचे आराखडे (plans) जी/ऊत्तर कार्यालयात उपलब्ध असुन नागरीक ते कधीही पाहु शकतात. सदर मैदानाच्या दैनंदिन देखभालीकरीता स्वतंत्र कंत्राटी संस्था नेमण्यात येणार असून त्या करीता स्थानिक रहिवाश्यांची steering committee बनविण्यात येईल जी पालिकेला सहकार्य करेल असेही महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - नारायण राणेंच्या निवासस्थानी मनपाचे पथक रवाना;पोलीस बंदोबस्त तैनात