ETV Bharat / city

राज्यातील २५० ऑक्सिजन वाहतूक टँकर्संना लागणार जीपीएस यंत्रणा - ऑक्सिजन वाहतूक टँकर्संना जीपीएस यंत्रणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, याकरिता महाराष्ट्रातील २५० ऑक्सिजन टँकर्सना लवकरच जीपीएस प्रणाली लावण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

oxygen transport tankers
oxygen transport tankers
author img

By

Published : May 5, 2021, 12:22 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांना तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, याकरिता महाराष्ट्रातील २५० ऑक्सिजन टँकर्सना लवकरच जीपीएस प्रणाली लावण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच ऑक्सिजन टँकर्सवर जीपीएसच्या माध्यमातून २४ तास परिवहन विभागाची नजर राहणार आहे.

ऑटोमोबाईल डीलर्सकडून जीपीएससाठी मदत -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील हलाखीची परिस्थिती पाहून ऑटोमोबाईल डीलर्सना शासनास ठोस मदत करायची होती. यासंदर्भात परिवहन विभागाचे आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याशी संघटनेने चर्चा केली. त्यात दिवसरात्र राज्यातील ऑक्सिजन टँकर्सवर नजर ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मुद्दा पुढे आला होता.
त्यासाठी फेडरेशनने पुढाकार घेतला असून ऑक्सिजन टँकर्सला जीपीएस लावण्यासाठी येणारा १० लाख रुपयांचा खर्च फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सच्या महाराष्ट्र विभागाने करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ऑटोमोबाईल डीलर्स संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर जतीन शेठ यांनी सांगितले आहे.

परिवहन विभाग करणार नियंत्रण-

अमर जतीन शेठ यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, राज्यात सुमारे २५० टँकर्स आहेत. या २५० ऑक्सिजन टँकर्सना जीपीएस लावून त्याचे नियंत्रण फोर्ट येथील परिवहन आयुक्त कार्यालयातून केले जाणार आहे. परिणामी, राज्यात या सर्वच टँकर्सवर नजर ठेवता येईल. ही मदत तत्काळ मिळावी म्हणून तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात सर्व टँकर्सना जीपीएस यंत्रणा लावली जाईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

तात्काळ मिळणार मदत -

या यंत्रणेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारे ऑक्सिजन टँकर्स परिवहन आयुक्त कार्यालयातून नियंत्रित केले जातील. तसेच ज्याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज आहे, अशा ठिकाणी टँकर्स वळवण्यातही मदत होणार आहे. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्याही टँकर्स चालकाला किंवा संबंधित व्यक्तिला ऑक्सिजनचा गैरवापर करता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.