मुंबई - राजभवनमधील कर्मचाऱ्याने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. कमलेश केतू जाधव ( वय 53 वर्ष ) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येसाठी उडी मारलेल्या कमलेशला समुद्रकिनाऱ्यावरील तीन पर्यटकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला.
राजभवनमध्येच राहत होता कमलेश जाधव - कमलेश केतू जाधव हा राज भवन येथे कामाला होता. तो तिथेच राहत होता. आत्महत्या करण्याकरिता जाधव यांनी उडी मारली त्यावेळी समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या तीन व्यक्तींनी कमलेशला समुद्रातून बाहेर काढले. मात्र रुग्णालयात घेऊन गेले असता, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
तीन तरुणांनी केला वाचवण्याचा प्रयत्न - कमलेशने मारिन लाईन येथून समुद्रात उडी मारली होती. समुद्रात उडी मारल्याचे कळताच तीन युवकांनी पाण्यात उडी घेत त्याला बाहेर काढले. बाजूलाच असलेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्वरित मदत करत गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. कमलेशने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.