ETV Bharat / city

"राज्यातील आदिवासींचे प्रलंबित वनपट्ट्यांचे अधिकार पुढील 3 महिन्यात निकाली काढा"

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्या, विशेषतः आवास तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज आणि इतर उपजीविकेसाठी देण्यात येणारे वन अधिकार इत्यादी विषयांबाबत राज्यपालांनी आज (शुक्रवार) राजभवन येथे बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.

governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
author img

By

Published : Jul 3, 2020, 9:17 PM IST

मुंबई - राज्यातील आदिवासींचे प्रलंबित असलेले वनपट्ट्यांचे अधिकार पुढील तीन महिन्यात निकाली काढण्यात याव. तसेच, अनुसूचित क्षेत्राची अद्ययावत स्वरुपात जीपीएस मॅपिंगची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (शुक्रवार) शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्या, विशेषतः आवास तसेच वन हक्क कायद्याअंतर्गत गौण वनौपज आणि इतर उपजीविकेसाठी देण्यात येणारे वन अधिकार इत्यादी विषयांबाबत राज्यपालांनी आज (शुक्रवार) राजभवन येथे बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला.

अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांच्या समस्यांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनावर घेतली बैठक

हेही वाचा - भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर; पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी देणार

पालघर जिल्ह्यातील, अशासकीय संस्थांमार्फत आदिवासी समस्यांसंदर्भात प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने राज्यपालांनी महसूल व वन विभागाचे अधिकारी आणि संबंधित अशासकीय संस्थाचे पदाधिकारी यांची ही संयुक्त बैठक घेतली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

बैठकीला अपर मुख्य सचिव (वने) मनु कुमार श्रीवास्तव, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, आदिवासी विभागाच्या सचिव विनिता वेद, राज्यपालांच्या उपसचिव श्वेता सिंघल, पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे, पालघर जिल्ह्याचे वनाधिकारी, तसेच मिलिंद थत्ते (नाशिक), ब्रायन लोबो (पालघर) तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील काही अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.