मुंबई : राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी कालपासून ( Movement of Thousands of Anganwadi Workers ) प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ( Protesting at Every Collectorate Since Yesterday ) आंदोलन करीत असल्यामुळे बालकांना आणि महिलांना मिळणाऱ्या सेवा ठप्प झाल्या होत्या. यावर शासनाच्या वतीने महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ( Minister Lodha Contacted To Leader of Anganwadi ) तातडीने अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे नेते एम. ए. पाटील यांच्याशी बैठक केली. त्या बैठकीत अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवू आता आंदोलन थांबवा, असे आवाहन केले आणि त्यानंतर आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले आहे.
सरकारची अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा : राज्यातील लाखभर अंगणवाडी कर्मचारी यांना कल्याणकारी सोईसुविधा आणि लाभ मिळावा, त्यांचे मानधन वाढवावे. त्यांना इतर भत्ते आणि महागाईनुसार मानधन मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी काल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनामुळे अंगणवाडीमधील सोईसुविधांवर परिणाम झाला. शासनाने याबाबत त्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केले. आंदोलन थांबवा तुमच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याचे आवाहन : यासंदर्भात अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे नेते कॉम्रेड एम. ए. पाटीले यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी सांगितले, "मंत्री महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार अंगणवाडी कर्मचारी हे कायद्याद्वारे नियुक्त केले असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. राज्यातील समस्त अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन अत्यंत कमी आहे, ते इतर राज्यात जे सर्वाधिक आहे ते आता मान्य करावे. त्याची अंमलबजावणी त्वरित करावी." या मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली महिला बाल विकास मंत्रालय त्वरित निर्णय घेणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.