ETV Bharat / city

मतदारांसाठी 'फ्लॅश मॉब'द्वारे जनजागृती; मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम - केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा

आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया मतदानाची तयारी ! या आशयाचा मतदानाचा संदेश देत शहरातील विविध भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी फ्लॅश मॉबद्वारे जनजागृती केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम केला आहे.
author img

By

Published : Oct 11, 2019, 9:39 AM IST

मुंबई - आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया मतदानाची तयारी ! या आशयाचा मतदानाचा संदेश देत शहरातील विविध भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी फ्लॅश मॉबद्वारे जनजागृती केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम केला आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा यांच्या प्रमुख उपस्थित शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत असून, या संकल्पनेत नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. दि.21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, मुंबईकरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होऊन उत्साह वाढावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी हा प्रयत्र करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबंधित फ्लॅश मॉबमध्ये पथनाट्य, नृत्य, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येत असून, विविध सादरीकरणातून जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा मालेगाव येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदान जागृतीचा संदेश

पुढील काळात, मुंबई सेंट्रल, सायन, सीआर 2 मॉल, जयहिंद कॉलेज, रुईया कॉलेज, खालसा कॉलेज, अशा प्रमुख ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन व ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी याजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन झाले त्या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.

Intro:

मतदानाविषयी जागृत करण्यासाठी फ्लॅश मॉबद्वारे मतदानाचा मुंबईकरांना संदेश

आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी ! असा मुंबईकरांना मतदानाचा संदेश फ्लॅश मॉबद्वारे देत मुंबई शहरातील मतदानाचा टक्का अधिक वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्याकडून देण्यात येत आहे.सर्वत्र केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत आहे.त्यास मुंबईकरांनी उत्साही दाद देत आहेत.

दि. 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार असून मुंबईकरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होवून उत्साह वाढावा , मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करुन ‘ सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया 21 तारखेच्या मतदानाची तयारी ! ’ असा संदेश देण्यात येत आहे.
या फ्लॅश मॉबमध्ये पथनाट्य, नृत्य , देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविध सादरीकरणातून योग्य तो संदेश युवावर्गापर्यंत जातो. नृत्य आणि नाटक यांचा योग्य तो संगम साधून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यात येत आहे.

पुढील काळात, मुंबई सेंट्रल, सायन, सीआर 2 मॉल, जयहिंद कॉलेज, रुईया कॉलेज, खालसा कॉलेज, अशा प्रमुख ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन व ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे.आतापर्यंत ज्या ठिकाणी याजनजागृती कार्यक्रमाचेआयोजन झाले त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

Body:मConclusion:म
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.