ETV Bharat / city

Ganesh Darshan Bus Service : बेस्टच्या गणेश दर्शन बससेवेला चांगला प्रतिसाद, १० दिवसात २५ हजार प्रवाशांचा प्रवास

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा ( Ganeshotsav is celebrated with pomp ) करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध अशा गणपती मंडळांना नागरिक, पर्यटकांना भेटी देता याव्यात यासाठी बेस्टने गणेश दर्शन रात्र बस सेवा ( BEST Ganesh Darshan Night Bus Service ) सुरू केली होती. या बसला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला ( Good response to BEST Ganesh Darshan night bus service ) आहे.

Good response to bus service
बससेवेला चांगला प्रतिसाद
author img

By

Published : Sep 14, 2022, 9:16 AM IST

Updated : Sep 14, 2022, 11:39 AM IST

मुंबई - मुंबईत अडीच वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा ( Ganeshotsav is celebrated with pomp ) करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध अशा गणपती मंडळांना नागरिक, पर्यटकांना भेटी देता याव्यात यासाठी बेस्टने गणेश दर्शन रात्र बस सेवा ( BEST Ganesh Darshan Night Bus Service ) सुरू केली होती. या बसला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला ( Good response to BEST Ganesh Darshan night bus service ) आहे. १० दिवसांत २५ हजार ७१२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून बेस्टला ४ लाख ५३ हजार २६९ रुपये महसूल मिळाल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे ( Public Relations Officer Manoj Varade ) यांनी सांगितले.

२५ हजार प्रवाशांचा प्रवास - मुंबईत गणेशोत्सवाचा ( Ganeshotsav in Mumbai ) आनंद वेगळाच असून गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंतामणी असे प्रसिद्ध गणरायांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील भक्त गणेशोत्सव मुंबईत येतात. गणेश भक्तांसाठी बेस्ट उपक्रमाने गणेश दर्शन रात्र बस सेवा ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुरु केली होती. गणेश दर्शन रात्र बस सेवेला गणेश भक्तांचा भरपूर प्रतिसाद मिळाला असून १० दिवसांत २५ हजार ७१२ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून बेस्टला ४ लाख ५३ हजार २६९ रुपये महसूल मिळाल्याचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितले.

विशेष रात्र बस सेवा - मुंबईत दहीहंडी, गणेशोत्सव हे सण ( Dahihandi Ganeshotsav in Mumbai ) मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. गणेशोत्सवात विविध देखावे, वेगवेगळ्या मुर्त्या पाहण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक पर्यटक मुंबईत ( Domestic and foreign tourists in Mumbai ) येतात. मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी आणि रात्री विशेष करून भाविक आणि पर्यटक मंडळांना भेटी देतात. याठिकाणी पर्यटक आणि भाविकांना भेटी देता याव्यात यासाठी बेस्टने गणेश दर्शन रात्र बस सेवा सुरू केली होती.

डिजिटल सेवा - बेस्टकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध तिकिटाचे प्लॅन आणले आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत बेस्ट कडून ७९९ रुपयांचा प्लॅन १९९ रुपयांचा करण्यात आला होता. चलो ॲप डाऊनलोड करून ऑनलाईन ॲपद्वारे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ दिला होता. याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. तसेच प्रवाशांना आरामदायी आणि चांगला प्रवास करता यावा यासाठी एसी बसेस चालवण्यात येत आहेत.

Last Updated : Sep 14, 2022, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.