ETV Bharat / city

मागणीत वाढ कायम राहिल्याने सोने चांदीचे भाव चढेच...

सोमवारी सोन्याने 48 हजारांची पातळी ओलांडली होती. त्यादिवशी सोने 48,150 वर बंद झाले होते. त्या दिवसापासून सोन्याची किंमत सातत्याने 48 हजारांच्या पुढे गेली आहे.

Kumar jain on gold price
सोने चांदी भाव वधारले
author img

By

Published : Jun 24, 2020, 8:51 PM IST

मुंबई - चालू आठवड्यापासून म्हणजेच सोमवारपासून सोन्याच्या किंमती निरंतर वाढत आहेत. आज (बुधवार) 24 कॅरेट सोने 10 ग्रॅम (एक तोळा) 48,482 रुपये दराने विकले जात आहे. किरकोळ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यामागे मागणीत वाढ होणे हे कारण आहे. वास्तविक सोमवारी सोन्याने 48 हजारांची पातळी ओलांडली होती. त्यादिवशी सोने 48,150 वर बंद झाले होते. त्या दिवसापासून सोन्याची किंमत सातत्याने 48 हजारांच्या पुढे गेली आहे. भारतीय सराफा व ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारी भारतातील सोन्याचे दर 48,020 रुपयांवरून 48,120 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले.

मागणीत वाढ कायम असल्याने सोने चांदीचे भाव वधारत असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले...

हेही वाचा... धक्कादायक - कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात ! आरोग्य यंत्रणेची बेफिकिरी

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि आकारणी या शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती वेगवेगळ्या दुसऱ्या धातूचा तुलनेत वाढल्या आहेत. दुसरीकडे मंगळवारी जागतिक सराफा बाजारात घसरण आणि रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती 57 रुपयांनी घसरून 48,931 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. चांदीही 477 रुपयांनी घसरून 49,548 रुपये प्रतिकिलोवर आली. कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि अमेरिकन फेडरल बँकेची धोरणे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या चांदीच्या दरावर परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.