ETV Bharat / city

'पत्रकारही फ्रंटलाईन वॉरियर्स, त्यांनाही प्राधान्याने लस द्या' - corona news

एका वृत्तसंस्थेच्या कॅमेरामनचे रविवारी कोरोनाने निधन झाले. तर काही पत्रकार इस्पितळात उपचार घेत आहेत. याचा सारासार विचार करत जितेंद्र आव्हाड यांनी सर्व पत्रकारांना कोरोना लस द्यावी अशी मागणी केली आहे.

'पत्रकारही फ्रंटलाईन वॉरियर्स, त्यांनाही प्राधान्याने लस द्या'

author img

By

Published : Apr 5, 2021, 3:37 PM IST

ठाणे : कोरोनाचा धोका वेगाने वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून वृत्तसंकलन करणारे पत्रकारही फ्रंटलाईन वॉरियर आहेत. त्यामुळे त्यांनाही प्राधान्याने कोरोनाची लस देण्यात यावी अशी आग्रही मागणी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

एका वृत्तसंस्थेच्या कॅमेरामनचे रविवारी कोरोनाने निधन झाले. तर काही पत्रकार इस्पितळात उपचार घेत आहेत. याचा सारासार विचार करत जितेंद्र आव्हाड यांनी सर्व पत्रकारांना कोरोना लस द्यावी अशी मागणी केली आहे. याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याची घोषणा होईल असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पत्रकारांसाठी मागणी केल्यावर लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मागणी मान्य केली आणि त्यावर उपाययोजना लवकरच करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याची माहितीही आव्हाड यांनी ट्विटरवरून दिली आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे

यम सर्वांच्या दारात उभा असून त्याला आत घ्यायचे कि बाहेरच ठेवायचे असे सूचक वक्तव्य करत नागरिकांनी नियम आणि निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंब्रा कौसा येथील कोरोना इस्पितळातून काही पालिका अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे नेलेले व्हेंटिलेटर आणि इतर साहित्य आणून दिले असून हे इस्पितळ लवकरच पूर्ववत सुरु होईल असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.