ETV Bharat / city

मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना मोफत उपचार द्या, खा. राहुल शेवाळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

author img

By

Published : May 11, 2021, 7:28 PM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' या योजनांच्या माध्यमातून मोफत कोरोना उपचार द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

खासदार राहुल शेवाळे
खासदार राहुल शेवाळे

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' आणि 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' या योजनांच्या माध्यमातून मोफत कोरोना उपचार द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना मोफत उपचार द्या

काय म्हटले आहे राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात

खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, गेल्या वर्षभरापासून माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीय रहिवाशी सोसायट्या, इमारती यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीला लागण झाली की अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढते आहे. सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण असल्याने मध्यमवर्गीय रुग्णांना परिसरातील नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागते. एका कोरोना रुग्णाचे दहा दिवसांचे कमीत कमी बील साधारण दीड ते दोन लाख रुपये होते. त्यातच घरातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित झाल्यास हा आकडा कमीतकमी दहा लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडतो. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या रुग्णांचा 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' किंवा 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' या योजनांमध्ये समावेश करून त्यांना मोफत कोरोना उपचार दिल्यास राज्यातील मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल.

हेही वाचा - नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीय नियंत्रण कक्षाची केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.