ETV Bharat / politics

"आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला..."; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Anil Deshmukh On Devendra Fadnavis

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Anil Deshmukh On Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दिशा सालियान मृत्यू प्रकरण, चांदीवाल आयोग अहवाल, उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप अशा विविध मुद्द्यांवरुन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

Anil Deshmukh On Devendra Fadnavis
अनिल देशमुखांचा गंभीर आरोप (Source - ETV Bharat)

पुणे Anil Deshmukh On Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सातत्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. विविध प्रकरणांमध्ये कसं अडकवण्यात आलं, याची पोलखोल देशमुख हे आता करत आहेत. त्यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) आणखी एक गौप्यस्फोट केला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं, असा खोटा आरोप करण्यास फडणवीस यांनी सांगितल्याचा धक्कादायक आरोप देशमुख यांनी केलाय. या आरोपानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप : "देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळचा माणूस माझ्याकडं पाठवला. त्यानं देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं करून दिलं. त्यावेळी फडणवीसांनी मला सांगितलं की, 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात तुमचा काहीच दोष नाही. त्यानंतर दोन दिवसांनी फडणवीसांनी मला एक पत्र पाठवलं होतं. त्यात उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 300 कोटी मागितले, असा खोटा आरोप करायला सांगितला होता. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानवर बलात्कार केला, असा खोटा आरोप करायला फडणवीस यांनी सांगितलं. मी नकार दिला तेव्हा, माझ्यावर पहिली सीबीआयची रेड पडली," असे गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यवर केलेत.

अनिल देशमुखांचा गंभीर आरोप (Source - ETV Bharat Reporter)

नोटीस पाठवण्यात आली : गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अहवाल जाणीवपूर्वक दडवला : "गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता. या संपूर्ण चौकशीनंतर आयोगानं दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मला क्लीन चिट मिळाल्यामुळं राज्य सरकारनं हा अहवाल जाणीवपूर्वक दडवून ठेवलाय," असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

....अन्यथा न्यायालयात जाणार : "चौकशीनंतर माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. मात्र, अहवाल सादर केल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीचं सरकार पडलं. हा 1400 पानांचा चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी मी सातत्यानं करत आहे. मी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना अनेक पत्रं लिहून हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली. तरीही अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. त्यामुळं आता या अहवालासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून, पुढील दहा दिवसात हा अहवाल सार्वजनिक करावा, अन्यथा न्यायालयात जाणार," असा इशारा देशमुख यांनी दिला.

हेही वाचा

  1. राज्यात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर; मात्र मुलांचं लक्ष वेगळीकडेच, अजितदादांचं मिश्कील वक्तव्य - Ajit Pawar Speech
  2. मंत्रालयात तोडफोड करणारी महिला मानसिक रुग्ण; पोलिसांची माहिती - Devendra Fadnavis Office Attack
  3. 'लाडकी बहीण' योजनेचा पैसा कुणाचा? देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा काढला 'बाप' - Devendra Fadnavis On Ladki Bahin

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.