मुंबई - मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा मुंबईच्या बचावासाठी मोठा निर्णय असून स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ गिरीष राऊत यांनी व्यक्त केली आहे.
मेट्रो कारशेडसाठी मुंबईत आतापर्यंत 7 ते 8 हजार झाड तोडण्यात आली. त्यातही आरेतील झाडे रात्रीच्या वेळी तोडण्यात आली. त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर नागरिकांना मोठा दिलासा दिल्याचे राऊत म्हणाले.