मुंबई ः शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेक छोटे पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत आहेत. संभाजी ब्रिगेडने शिवसेनेशी हातमिळवणी केली. भाजप नेते आणि राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने आघाडी Shiv Sena is in alliance with NCP करत आधीच राजकीय आत्महत्या केली आहे. आता संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षात उतरल्याने लोकांचा दृष्टिकोन बदलेल, असे गिरीश महाजन म्हणाले. मंत्रालयात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
संभाजी ब्रिगेड आजवर कधीच राजकीय पक्षात कधी गेले नाहीत. समाजासाठी लढणारी संस्था त्यांची ओळख आहे. आता राजकारणात प्रवेश केल्याने त्यांच्याबद्दल बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलणार आहे, अशी टीका भाजप नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी आरएसएस बाबत केलेल्या विधानांचाही समाचार घेत, उद्धव ठाकरेच आजवर सातत्याने आपली वक्तव्य बदलत आहेत, असा टोला लगावला. आरएसएस आणि भाजप काय आहे हे लोकांना सांगायची गरज नाही, सर्वांना माहित आहे. मात्र सोनिया गांधी यांच्यासोबत कोणता हिंदुत्व करून ठेवला, अशा शब्दांत हल्लाबोल चढवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना डिवचले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून शिवसेनेने मत मिळवली. त्यामुळे 56 आमदार निवडून आले अन्यथा 20 लोक सुद्धा निवडून आले नसते. संजय राऊत यांनी कान फुंकल्याने युती तुटली असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून राजकीय आत्महत्या केली आहे. आता पिता पुत्र दौरे काढत आहेत. उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा चिमटा काढला. फारसा त्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. Girish Mahajan commented Alliance with NCP is political suicide of Shiv Sena
हेही वाचा Ghulam Nabi Azad To Form New Party गुलाम नबी आझाद स्थापन करणार नवा राजकीय पक्ष