ETV Bharat / city

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला - गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Feb 8, 2021, 4:46 PM IST

मुंबई- सामाजिक कार्यकर्ते व भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावले आहे. गौतम नवलखा यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या जामीन याचिकेत त्यांनी म्हटले होते की, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते.

हेही वाचा - आंदोलनजीवी म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना मारला टोला

90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल नाही- कपिल सिब्बल

या अगोदरच्या सुधारित गौतम नवलखा यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले होते की, ऑगस्ट 2018 मध्ये गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना एक महिना घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर तुरुंगात पाठवल्यानंतर जवळपास 100 हून अधिक दिवस त्यांनी तुरुंगात काढले आहेत. या प्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे गौतम नवलखा हे जामिनासाठी पात्र ठरत असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.

गौतम नवलखा यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायाधीश मकरंद कर्णिक यांनी 17 डिसेंबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवलेला होता. मात्र, सहा आठवड्यांनंतर गौतम नवलखा यांची जामीन याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.