ETV Bharat / city

Gangster Suresh Pujari in custody : गॅंगस्टर सुरेश पुजारीच्या पोलीस कस्टडीत 3 फेब्रुवारीपर्यंत वाढ - Gangster Suresh Pujari in custody

मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकारणात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गॅंगस्टर सुरेश पुजारी याला अटक ( Extortion case against Suresh Pujari ) केली आहे. या प्रकरणातील ही सातवे अटक आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी सुरेश पुजारी टोळीच्या दोन हस्तकासह तीन शूटर्स आणि एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

गॅंगस्टर सुरेश पुजारी
गॅंगस्टर सुरेश पुजारी
author img

By

Published : Jan 29, 2022, 7:03 PM IST

मुंबई- गुन्हे शाखेने गँगस्टर सुरेश पुजारी याला आज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पुजारीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ( Gangster Suresh Pujari in police custody ) पाठविले आहे.

मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकारणात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गॅंगस्टर सुरेश पुजारी याला अटक ( Extortion case against Suresh Pujari ) केली आहे. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी सुरेश पुजारी टोळीच्या दोन हस्तकासह तीन शूटर्स आणि एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत १,४११ नव्या रुग्णांची नोंद, ११ जणांचा मृत्यू

आज कोठडीची संपणार होती मुदत-
गुन्हे शाखेने या प्रकरणात मोक्का कायद्यानुसार कारवाई करत विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र ( MOCCA case against Gangster Pujari ) दाखल केल. या गुन्ह्यात सुरेश पुजारी याला पहिल्या क्रमांकाचे आरोपी दाखवण्यात आले. अखेर खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने सुरेश पुजारी याचा ताबा एटीएसकडून घेतल्यानंतर त्याला गुन्ह्यात अटक केली आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रवानगी करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता पुन्हा 5 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात ( Gangster Suresh Pujari police custody extended ) आली आहे.

हेही वाचा-Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत बिनसलं.. नवीन मित्र शोधण्याचा 'या' पक्षाचा इशारा

सुरेश पुजारीवर 51 गुन्हे दाखल-
गॅंगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई अशा ठिकाणी एकूण 51 गुन्हे दाखल आहे. यातील 17 गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल असून 10 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा करत आहे. यात मोक्का कायद्यान्वये 6, खुनाच्या प्रयत्नात 3 आणि खंडणीच्या 4 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर ठाणे पोलिसांकडे 30 राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडे 2, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पोलिसांकडे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा-Union Budget 2022 Expectations : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत चंद्रपुरकरांच्या 'या' आहेत अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.