ETV Bharat / city

Salim Fruit ED Custody : गॅंगस्टर छोटा शकीलचा निकटवर्तीय सलीम फ्रुटला ईडीने घेतले ताब्यात - शकीलचा निकटवर्तीय सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात

ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास 17 ते 18 देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते.

सलीम फ्रुट
सलीम फ्रुट
author img

By

Published : Feb 15, 2022, 3:30 PM IST

मुंबई - ईडी आणि एनआयए संयुक्त कारवाई आज (मंगळवारी) मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या निकटवर्तीय तसेच दाऊद संबंधित शंका असलेल्या लोकांवर अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात 10 ठिकाणी धाडी टाकण्यात आले आहे. त्यात मुंबईत 8 तर ठाण्यात 1 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या सर्च ऑपरेशनमधील काही टीम आता ईडी कार्यालयात परत आले असून अनेक कागदपत्रसोबत घेऊन आल्याची माहिती आहे.

याप्रकरणात महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडी ही छापेमारी करत आहे. याबाबत अजूनपर्यंत ईडीचे अधिकृत वक्तव्य आले नाही आहे. पण याप्रकरणात ईडीने गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास 17 ते 18 देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते.

आज दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हसीना पारकरच्या घरी तब्बल चार तास ईडीने छापेमारी केली. त्यानंतर आता ईडी पारकरच्या घराबाहेरून निघाली आहे. गॅंगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट ईडीने चौकशी करण्याकरीता ताब्यात घेतले आहे. सलीम फ्रुट याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे देखील दाखल आहे. खंडणी, खून यासारखे अनेक गुन्हे सलीम फ्रुटवर दाखल असून गेल्या कित्येक दिवसापासून त्याला एका प्रकरणात तडीपार देखील करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबईत आला असता आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दाऊद इब्राहिम संबंधित प्रकरणामुळे आज ईडी त्याला अटक करण्याची देखील शक्यता आहे.

हेही वाचा - Terrorist Attack on Shirdi : साईबाबांच्या शिर्डी नगरीवर दहशतवाद्यांचा डोळा ; अटक केलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.