ETV Bharat / city

Mumbai Crime रिक्षा प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच अटकेत - मालाड कुरारगाव परिसरात राहणारे

Mumbai Crime रात्रीच्या वेळेस रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना ( Kurar Police ) यश आले आहे. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मित्र आहेत.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Sep 23, 2022, 10:43 PM IST

मुंबई रात्रीच्या वेळेस रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना ( Kurar Police ) यश आले आहे. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी हे मित्र आहेत. ( Mumbai Police ) आकाश दत्ता शिंदे (वय 24), महेश अशोक कांबळे (वय 27), सनी शहाजी घोडे (वय 26), राम अशोक राक्षे (वय 25), गणेश अनिल राक्षे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Mumbai Police ) पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी रिक्षाचालक असून त्याचे चार साथीदार हे सर्व मालाड कुरारगाव परिसरात राहणारे आहेत. या सर्व आरोपींना कुरार पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे. 24 ते 26 वर्षे वयोगटातील हे आरोपी आहेत.

मालाड परिसरात 18 सप्टेंबरच्या रात्री 23 वर्षीय दीनबंधू दास आणि 25 वर्षीय कल्याण दुलाई हे दोघे हॉटेलमध्ये जेवून बाहेर येऊन रिक्षाची वाट पाहत उभे होते. दरम्यान, त्या ठिकाणी एक रिक्षाचालक त्यांना कुठे जायचं, असे विचारण्यासाठी आला आणि चला मी तुम्हाला सोडतो असे म्हणत त्यांना रिक्षात बसवले. या रिक्षात अगोदरच चारजण बसले होते. मात्र फिर्यादी आणि रिक्षाचालक हे एकमेकांना ओळखत असल्यामुळे फिर्यादी या रिक्षात बसले.

काही वेळानंतर रिक्षा काही अंतर पार करुन पुढे गेल्यावर त्या चारही प्रवाशांनी दीनबंधू दास आणि कल्याण दुलाई यांच्या मानेवर सुरा ठेवून दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील पाच हजार रुपये देखील लुटले. यानंतर चौघांनी त्या दोघांना रिक्षाच्या बाहेर फेकून दिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.