मुंबई - डोंबिवली आणि कल्याण परिसरातून पिस्तूलांची खरेदी-विक्री (Buying and Selling Pistols) करणाऱ्या 11 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने (Mumbai ATS) मोठी कारवाई केली आहे. देशी बनावटीच्या पिस्तूलाची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुंबई एटीएसने पर्दाफाश केला आहे.
आरोपींकडून शस्त्र जप्त -
आरोपींकडून 13 उच्च दर्जाची देशी बनावटीची पिस्तूल आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्या प्रकरणी या 11 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला होता का किंवा होणार होता का? याचा आता पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू -
गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याचा वापर विविध गुन्ह्यांत होत असल्याने अशा शस्त्र तस्करांविरुद्ध महाराष्ट्र एटीएसने विशेष मोहीम सुरू केली होती. ही मोहीम सुरू असताना मुलुंड येथून काळाचौकी युनिटच्या अधिकार्यांनी एका तरुणाला घातक शस्त्रांसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने कांदिवली, डोंबिवली, उल्हासनगर, उरण आदी 9 ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत पोलिसांनी 13 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 36 जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
या पिस्तूलचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का? किंवा कुठल्या गुन्ह्यांत या शस्त्रांचा वापर होणार होता का? ही शस्त्रे विविध राज्यातून मुंबईत विक्रीसाठी आणली होती. यापूर्वीही त्यांनी अशा शस्त्रांची विक्री केली आहे का? याचा आता एटीएस तपास करीत आहेत.