मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा ( Ganpati festival ) केला जातो. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे गणेशोत्सव निर्बंधामध्ये साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार असून त्यासाठीची तयारी मुंबईमध्ये सुरू ( Ganpati Festival Arrangement In Mumbai ) झाली आहे. यामुळे भाविकांना पुन्हा एकदा मुंबईमधील गणेशोत्सवाचा लाभ घेता येणार आहे.
मुंबईमधील गणेशोत्सव - मुंबईत गिरगाव ( Girgaon Mumbai ) येथे लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला. इंग्रजांच्या विरोधात जनजागृती आणि स्वांतत्र्य आंदोलनाचा प्रसार ( Spreading Awareness And Freedom Movement Against British ) करण्यासाठी या सणाचा उपयोग करण्यात आला. पुढे मुंबईत ठिकठिकाणी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला. विशेष करून मुंबईच्या लालबाग, परेल, गिरगाव, चेंबूर आदी ठिकाणी मोठ्या उंचीच्या गणेश मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. या परिसरात गणेशोत्वादरम्यान दहा दिवसात लाखो भाविक आणि पर्यटक भेट देतात. यामुळे मुंबईमधील वातावरण या दिवसात भक्तिमय झाले ( devotional atmosphere ) असते. या दहा दिवसाच्या सणादरम्यान करोडो रुपयांची उलाढाल होत असून त्यात सर्व धर्मियांचा सहभाग लाभत असतो.
गणेश गल्लीत २२ फुटांची विश्वकर्मा अवताराची मूर्ती - लालबाग गणेश गल्ली ( Lalbagh Ganesh Galli ) येथे ९५ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. "मुंबईचा राजा" अशी या गणेश ( Lalbagh Ganpati ) मंडळाची ओळख आहे. गेले ४५ वर्षे मुंबईमधील सर्वात उंच गणेश मूर्ती ( Tall Ganesha idol ) हा मान आम्ही जपला आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे आम्हाला गणेश उत्सव साजरा करता आलेला नाही. मात्र यंदा पुन्हा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा २२ फुटांच्या पीओपीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार ( Ganpati statue made by POP ) आहे. विश्वकर्मा अवताराची ही मूर्ती असेल. तसेच उत्तर प्रदेश येथे असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार आहे. ज्या मुंबईकरांना येथे जाता येत नाही त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाने पीओपी मुर्त्या वापरू नयेत असे म्हटले आहे. त्यासाठी आम्हाला पर्याय शोधावा लागणार असून आम्हाला त्यासाठी काही कालावधी लागणार आहे असे गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी म्हटले आहे.
माटुंग्याच्या जीएसबी येथे शाडू मातीची मूर्ती - माटुंग्याचा जीएसबी गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्तीला सोन्याचा गणपती म्हणून याला ओळख आहे. या मूर्तीवर सोन्याचे दागिने घातले जातात. १० दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे. बहुतेक मंडळ पीओपीच्या मुर्त्या बनवत असले तरी आम्ही मात्र शाडू मातीची मूर्ती बनवत आहोत. ५० टक्के मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे. कोरोना नंतर गणेशोत्सव निर्बंध नसताना साजरा होत आहे. यामुळे भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी माहिती अनंत पै यांनी दिली.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा - मुंबईमध्ये १० दिवस गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. सुमारे १२ हजार सार्वजनिक मंडळे मुंबईमध्ये आहेत. त्यापैकी ४० टक्के मंडळे शहर विभागात तर ६० टक्के मंडळे उपनगरात आहेत. राज्य सरकराने गेले २ वर्षे असलेले कोरोनावरील निर्बंध हटवले आहेत. यामुळे २०१९ पर्यंत ज्या पद्धतीने गणेशोस्तव साजरा केला जात होता असाच उत्सव १० दिवस साजरा केला जाईल. मुर्त्यांची प्रतिष्ठापना करताना, मुर्त्यांचे विसर्जन करताना, आणि मिरवणूका काढताना प्रदूषण कायदा तसेच इतर कायद्यांचे पालन सर्व मंडळांनी करावे असे आवाहन बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
कृत्रिम तलाव - मुंबईमध्ये लहान मोठी अशी १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्याच प्रमाणे दोन लाखाहून अधिक घरगुती मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. मुंबईमध्ये घरगुती मूर्त्यांना २ फुटांची तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ फुटांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचे निर्देश महापालिकेने दिले होते. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पालिकेकडून विभागवार कृत्रिम तलाव निर्माण केले जातात. या तलावांमध्ये मुर्त्यांचे विसर्जन केले जाते. यंदा मुंबईमध्ये मूर्त्यांवर निर्बंध नसल्याने चौपाटीवरही पालिकेकडून विसर्जनाची तयारी केली जाणार आहे.
हेही वाचा - Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा