ठाणे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या किसननगर परिसरातील अनेक गणेश मंडळांना भेटी Visits to Eknath Shinde circles दिल्या. या मंडळांना भेटी देऊन त्यांनी त्या ठिकाणी आरती देखील Participating in Ganaraya Aarti केली. या भेटी देण्यामागे जुन्या मित्रांना भेटणे आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणे, हा उद्देश असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आज सकाळी वर्षावर आणि दुपारी ठाण्यातील घरी गणेशाची स्थापना झाल्यानंतर, एकनाथ शिंदे हे ठाण्यात किसन नगर भागात फिरत होते.Ganeshotsav 2022
गणेशोत्सवानिमित्त मंडळांना भेट देत आहोत. आनंद वाटतोय याच किसन नगर भागातून मी नगरसेवक झालो, आमदार झालो, त्यानंतर सगळी पदे मिळत गेली आणि आत्ता या राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला प्राप्त झाली. ज्या गणेश मंडळाची स्थापना मी केली होती; त्या मंडळांना मी भेटी देत आहे. या ठिकाणी मला सर्व जुने कार्यकर्ते भेटले, या भागातील नागरिक भेटले.
सुरुवात कोणी विसरता कामा नये: माझी सुरुवात या किसन नगर भागातून झाली, हे मी कधीही विसरू शकत नाही. या किसन नगर भागातील लोकांनी मला मोठे केले. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला संधी दिली आहे. या ठिकाणी दर्शन घेतले याचे समाधान आहे. सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा, याठीकाणी जनजागृती गणेश मंडळाला मी भेट दिली.
मी लहानपणापासूनच या मंडळात कार्यकर्ता म्हणून काम केलेल आहे. या ठिकाणी मंडप ,डेकोरेटर सर्व लोक या ठिकाणी आहेत. मात्र त्या काळामध्ये नागरिक आम्ही सर्व मिळुन काम करायचो. पूजेचे साहित्य पासून तर, मंडप उभारण्याचे काम देखील आम्ही करत होतो. एक वेगळा आनंद होता आजही तो आहे. सगळे कार्यकर्ते आज मला भेटले,म्हणुन मी समाधानी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसन नगर भागात, जण जागृती गणेश मंडळ आणि शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळ किसन नगर 3 मध्ये पूजा केली. Ganeshotsav 2022 CM Eknath Shinde Visits Ganesha Mandals In Thane