मुंबई - सर्वांना वेध लागलेले आहे ते गणेशोत्सवाचे. मुंबईतून भारत-पाक 'बॉर्डरचा राजा' काश्मीरसाठी रवाना झाला आहे. मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यातच भारत-पाक सीमेवर गणपती बाप्पा विराजमान होतो. मुंबईतून हा बाप्पा काश्मीरला रेल्वेने रवाना झाला आहे.
हेही वाचा - नाशिकच्या भद्रकाली श्रीमंत बाप्पाचे जोरदार स्वागत, 6 ढोल पथकांनी वेधले लक्ष
मुंबईतून सोमवारी भारत-पाक बॉर्डरचा राजा काश्मीरसाठी रवाना झाला आहे. जम्मू-काश्मीरात तणाव असला तरी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. काश्मीरातील गणेशभक्त किरण इशर यांनी मुंबईतून गणपती बाप्पांना घेऊन रवाना झालेत. गेल्या 10 वर्षापासून काश्मीरात गणेशोत्सव आनंदाने साजरा केला जातो आणि किरण ईशर या गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मूर्ती मुंबईतून नेतात.
हेही वाचा - बाप्पाच्या आगमनाची लगभग सुरु; इमिटेशन ज्वेलरीला मागणी वाढली
किरण इशर या गणपती नेताना म्हणाल्या, की सध्या सीमेवर तणाव आहे. सर्वकाही सुरळीत होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. आम्ही दहा दिवसांसाठी गणपती बसवत असून यामुळे सैनिकांमध्ये नक्कीच उत्साह निर्माण होईल. तसेच या सार्वजनिक गणेशोत्सवातून आम्ही प्रेम आणि बंधुभाव वाढीस लागावा यासाठीही प्रयत्न करणार आहोत.
हेही वाचा - महापुराचे भान ठेवून गणेशोत्सव साजरा करणार; पुण्यातील गणेश मंडळांची भूमिका
जम्मू आणि काश्मीरला विशेष सवलत देणारे घटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता सीमेवर गणेशोत्सव साजरे करण्याचे वेध तेथील नागरिकांनादेखील लागले आहे. बॉर्डरवर सुरक्षा आणि शांती टिकून राहावी तसेच सैनिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी जम्मूतील रहिवासी किरण इशर यांनी यंदा शांतताभंग वातावरण का असेना बाप्पा शांतता आणि समृद्धी देण्यासाठी भक्तांच्या घरी येतो हे मानत आपल्या घरी त्यांनी यंदाही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खास मुंबईहून त्या तीन गणेश मूर्ती जम्मू-काश्मीरला घेऊन गेल्या आहेत.