मुंबई : आरोपीकडे मोबाईल नसतानाही पोलिसांनी चिकाटीने प्रयत्न करून त्याला शिताफीने ( Gamdevi police arrested person ) अटक केले आहे. लैंगिक छळ प्रकरणी गावदेवी पोलिसांनी 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस अथक मेहनत घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या ( 100 days efforts of police ) आहेत.
17 जुनला संध्याकाळी 6:30 च्या सुमारास, एका व्यक्तीने 23 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासमोर स्वत:चे कपडे काढले आणि आक्षेपार्ह वर्तन केले. तरुणी तिच्या कुत्र्यासह केनेडी पुलाखाली फेरफटका मारत होती. या प्रकरणी आयपीसी कलम ५०९ अंतर्गत गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू होता. अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर आणि प्रमुख बसस्थानक, रेल्वे स्थानके आणि झोपडपट्टी भागात वॉन्टेड आरोपीचे पोस्टर लावल्यानंतर, आरोपी डीबी मार्ग आणि व्हीपी रोडच्या परिसरात दिसल्याचे इनपुट प्राप्त झाले. गुरुवारी टीमने त्याला एका फूटपाथवरून ( Mumbai crime news ) पकडले.
आरोपी मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आरोपी 32 वर्षांचा असून, मूळचा भदोही उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो चित्रकार म्हणून काम करत असे. तो मुंबईच्या फूटपाथवर राहायचा. घटनेनंतर तो उत्तर प्रदेशला पळून गेला होता. तो कोणताही फोन वापरत नाही. त्यामुळे तो शोधण्यात अडचण येत होती. पीडितेने मुंबई पोलिसांसाठी एक चिठ्ठी लिहिली आहे. ती तिच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्राम अणि ट्विटवर शेअर केली आहे.