ETV Bharat / city

फास्टॅग कॅशबॅकला भरभरून प्रतिसाद; 3 लाख 45,155 वाहनधारकांनी घेतला लाभ - फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली

लवकरच मुंबईसह राज्यात फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली लागू होणार आहे. त्यानुसार वाहनधारकांनी फास्टॅग लावून घ्यावे यासाठी वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोत्साहनात्मक 5 टक्के कॅशबॅक सवलत दिली आहे.

फास्टॅग
फास्टॅग
author img

By

Published : Jan 19, 2021, 7:44 PM IST

मुंबई - लवकरच मुंबईसह राज्यात फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली लागू होणार आहे. त्यानुसार वाहनधारकांनी फास्टॅग लावून घ्यावे यासाठी वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रोत्साहनात्मक 5 टक्के कॅशबॅक सवलत दिली आहे. याला फास्टॅगधारकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच केवळ सात दिवसात 3 लाख 45,155 वाहनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर याद्वारे सात दिवसात 19,08,597.85 इतक्या रकमेचा परतावा फास्टॅगधारकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणा (एमएसआरडीसी) ने दिली आहे.

26 जानेवारीपासून 100 टक्के फास्टॅग प्रणाली लागू-

केंद्र सरकारने फास्टॅग बंधनकारक केले आहे. तर राज्यात लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पण दरम्यान केंद्र सरकारकडून वर्षभरापूर्वीच फास्टॅग लागू केले. पण त्याच्या 100 टक्के अंमलबजावणीसाठी काही काळ दिला होता. तर सर्व टोलनाक्यावर किमान 2 मार्गिका तरी फास्टॅगच्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार राज्यात अनेक टोलवर 2 वा त्यापेक्षा अधिक मार्गिका फास्टॅगच्या करण्यात आल्या आहेत. या नियमाप्रमाणे सी लिंकवर 16 पैकी 6 मार्गिकेवर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तर आता 26 जानेवारीपासून येथे 100 टक्के फास्टॅग प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक वाहनधारकांपर्यंत पोहचण्यासाठी एमएसआरडीसीने सी लिंकसह मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक सवलत 11 जानेवारीपासून लागू केली आहे. याला वाहनधारकांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आहे.

मुंबईकरांनो फास्टॅग लावून घ्या-

5 टक्के कॅशबॅकचा 3 लाख 45 हजार 155 वाहनधारकांनी लाभ घेतला आहे. तर यातून केवळ सात दिवसात 19,08,597.85 रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर आता सी लिंकवर 26 पासून, मुंबई-द्रुतगती मार्गावर 15 फेब्रुवारीला 100 टक्के फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी फास्टॅग लावून घ्यावा, असे आवाहन विजय वाघमारे, सहव्यवस्थापक, एमएसआरडीसी यांनी केले आहे.

हेही वाचा- ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाच्या नावावर विक्रमच विक्रम!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.