ETV Bharat / city

Fraudster arrested In Mumbai : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला अटक - माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत

माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Former Energy Minister Nitin Raut ) यांच्या नावाचा वापर करून शेकडो तरूणांना फसवणाऱ्या तरूणाला अटक करम्यात आली आहे. नितीन राऊत नातेवाईक असल्याचे सांगत महाराष्ट्रातील ऊर्जा विभागात सरकारी नोकरी ( Govt Jobs in Energy Department in Maharashtra ) मिळवून देण्याच्या नावाखाली नवीन तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता.

Fraudster arrested In Mumbai
फसवणूक करणाऱ्याला मुंबईत अटक
author img

By

Published : Jul 20, 2022, 1:37 PM IST

मुंबई - मुंबई क्राइम ब्राॅँच युनिट १२ च्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. ज्याच्याविरुद्ध फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.अटक करण्यात आलेला आरोपी ( Fraudster arrested ) हा स्वत:ला माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Former Energy Minister Nitin Raut ) यांचा नातेवाईक असल्याचे सांगत महाराष्ट्रातील ऊर्जा विभागात सरकारी नोकरी ( Govt Jobs in Energy Department in Maharashtra ) मिळवून देण्याच्या नावाखाली नवीन तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करून फरार ( Absconded ) झाला होता.

विलास भोसले, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट

शेकडो तरुणांना फसवले - गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत शेकडो तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. या आरोपीचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा नुकताच समोर आला आहे. त्याशिवाय नितीन राऊत यांच्या नातेवाईकांशीही संबंध नसल्याचेसमोर आले आहे.

ऊर्जा विभागात नोकरी देण्याचे आश्वासन - संदीप कृष्णा राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सातारा जिल्ह्यातील ( Satara District ) रहिवासी असल्याच समोर आले आहे. तो मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये रहायला ( Guest House In Mumbai ) होता. त्यावेळी त्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना ऊर्जा विभागात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

बनावट कागदपत्र जप्त - गुन्हे शाखा युनिट १२ चे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, आरोपींकडून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - Supreme Court Hearing Shivsena Petition : लोकशाही धोक्यात - कपिल सिब्बल; शिवसनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.