ETV Bharat / city

Covid Fourth Wave : भारतात 'या' महिन्यापासून येणार कोरोनाची चौथी लाट.. टास्क फोर्सची उद्या बैठक

जगभरात काही देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरु झाली ( Covid Fourth Wave ) आहे. भारतात जून महिन्यात चौथी लाट येण्याचा अंदाज कानपुर आयआयटीने वर्तवला ( Covid Fourth Wave Kanpur IIT Prediction ) आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने टास्क फोर्सकडे मार्गदर्शन मागितले ( BMC Sought Guidance From Task Force ) असून, टास्क फोर्सची बैठक उद्या आयोजित करण्यात आली ( Covid Task Force Meet In Mumbai ) आहे.

भारतात 'या' महिन्यापासून येणार कोरोनाची चौथी लाट.. टास्क फोर्सची उद्या बैठक

author img

By

Published : Mar 20, 2022, 3:02 PM IST

मुंबई - जगभरात काही देशात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला ( Covid Fourth Wave ) आहे. भारतातही जूनपासून कोरोनाची चौथी लाट येईल असा इशारा देण्यात आला ( Covid Fourth Wave Kanpur IIT Prediction ) आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ नये म्हणून पालिका सतर्क आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच राज्याच्या टास्क फोर्सने चौथ्या लाटेबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली ( BMC Sought Guidance From Task Force ) आहे. टास्क फोर्सची उद्या बैठक आयोजित करण्यात आली ( Covid Task Force Meet In Mumbai ) आहे.

मुंबईमधील कोरोना आटोक्यात

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान मुंबईमध्ये कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान दिवसाला २८००, दुसऱ्या लाटेदरम्यान ११ हजार तर डिसेंबरपासून सुरु झालेल्या तिसऱ्या लाटेदरम्यान २० हजार रुग्ण दिवसाला आढळून आले आहेत. मुंबईमध्ये तिसरी लाट सध्या आटोक्यात आली असून, गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णसंख्या सध्या नोंद होत आहे. मुंबईत दिवसाला ५० ते ८० हुन कमी रुग्ण रोज आढळून येत आहेत.

टास्क फोर्सची उद्या बैठक

मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाली असतानाच जगभरात कोरोनाचा पुन्हा प्रसार वाढला आहे. चीन, कोरिया आदी अनेक देशात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. भारतात येत्या जूनमध्ये चौथी लाट येईल. ही लाट ऑक्टोबरपर्यंत असेल असा इशारा कानपुर आयआयटीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली असून, राज्याच्या टास्क फोर्सने चौथ्या लाटेबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडून राज्य टास्क फोर्सकडे करण्यात आली आहे. चौथ्या लाटेबाबत उद्या सोमवारी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये यावर चर्चा केली जाईल अशी माहिती टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी दिली.

बंद घरांवर पालिकेचा वॉच

मुंबईमध्ये आढळून येणारे रुग्ण हे स्थानिक नाहीत ते मुंबईबाहेरून येणारे रुग्ण आहेत. सध्या ५ राज्यातील निवडणुका संपल्या आहेत. त्या राज्यातून तसेच इतर राज्यातून नागरिक मुंबईत परतत आहेत. या परतणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने पालिका सतर्क आहे. आपल्या विभागात जी घरे बंद आहेत त्या घरामध्ये कोणी आल्यास त्याची माहिती पालिका घेत आहे. एखाद्याला कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जात आहे. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोना रोखण्याचे नियोजन पालिकेने केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्णसंख्या कमी असल्याने १० पैकी ३ कोविड सेंटर सुरु आहेत. वेळ पडल्यास सर्व कोविड सेंटर सुरु करता येतील, अशाप्रकारे ती सज्ज ठेवण्यात आली आहेत. टास्क फोर्सला मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असेही काकाणी यांनी सांगितले.

१० लाख ३७ हजार ६४२ मुंबईकरांना कोरोना

मुंबईत १९ मार्चच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ५३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७४४४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६,४९५ बेडस असून त्यापैकी ५० बेडवर म्हणजेच ०.२ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.८ टक्के बेड रिक्त आहेत.

३५ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ३५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात १७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.