ETV Bharat / city

Cruise Drugs Case : आणखी चार जणांना १४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

author img

By

Published : Oct 6, 2021, 5:42 PM IST

अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यसह एकूण १७ जणांना अटक केली होती. काल (मंगळवारी) विविध ठिकाणावरून उशिरा रात्रीपर्यत एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. काल सायंकाळी अटक केल्यामध्ये समीर सैगल, गोपाळ आंदन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल या चारही जणांना आज (बुधवारी) एनसीबीने न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चारही आरोपीना १४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

क्रूझ
क्रूझ

मुंबई - कॉर्डीया द क्रूझवर हायप्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई करत आतापर्यत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यसह एकूण १७ जणांना अटक केली होती. काल (मंगळवारी) विविध ठिकाणावरून उशिरा रात्रीपर्यत एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. काल सायंकाळी अटक केल्यामध्ये समीर सैगल, गोपाळ आंदन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल या चारही जणांना आज (बुधवारी) एनसीबीने न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चारही आरोपीना १४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

१६ जण एनसीबी कोठडीत -

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीवर एनसीबी म्हणजेच नार्कोटिस कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री धाड टाकून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यत ८ जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर एनसीबीकडून सतत अटक सत्र सुरुच आहे. मंगळवारी विविध ठिकाणावरून उशिरा रात्रीपर्यत एनसीबीने नऊ जणांना अटक केली आहे. एनसीबीने काल सकाळी केल्या कारवाईत अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना अटक केली होती. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. त्यांना किला कोर्टात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. तर आज समीर सैगल, गोपाळ आंदन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल या चार जणांना ही १४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. यामुळे आता ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबी कोठडीत असलेल्या आरोपींची संख्या १६ वर पोहचली आहे.

एकाची चौकशी सुरु -

काल रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन एनसीबी कार्यालयात नेले. अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली आहेत. यामुळे याप्रकरणी एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता १७ वर पोहचली आहे. अचिंत कुमार यांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला अटक करणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.