ETV Bharat / city

भरधाव कारने फुटपाथवरील लोकांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू - क्रॉफर्ड मार्केट फुटपाथ अपघात

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले लोक फुटपाथवरील होते, की गाडीमधील होते याबाबत साशंकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना जेजे रुग्णालयात नेले. त्याठिकाणी चौघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अन्य चार जणांवर उपचार सुरू आहेत.

Four killed as speeding car hits footpath in Mumbai
भरधाव कारने फुटपाथवरील लोकांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Sep 1, 2020, 6:09 AM IST

Updated : Sep 1, 2020, 10:24 AM IST

मुंबई : दक्षिण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर भरधाव गाडी फुटपाथवर चढल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, चार जखमी आहेत. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले लोक फुटपाथवरील होते, की गाडीमधील होते याबाबत साशंकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना जेजे रुग्णालयात नेले. त्याठिकाणी चौघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अन्य चार जणांवर उपचार सुरू आहेत.

भरधाव कारने फुटपाथवरील लोकांना चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू

या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये नईम, सरोजा, झुबेदा आणि एका अज्ञात महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये मोहम्मद जुही (32) नदीम अन्सारी (40) कमलेश (20) मोहम्मद नदीम (41)अशी जखमींची नावे आहेत. जखमींना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कारचालक सय्यद समीर अली याला ताब्यात घेण्यात आले असून, हा व्यक्ती हिस्ट्री शीटर असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीवर याआधीही अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल असून, बनावट चलनी नोटा बाळगण्यासारखे गुन्हे आरोपीवर दाखल असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Sep 1, 2020, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.