मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा Monsoon session Mahahrashtra चौथा दिवस, परंतु हा दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलाच गाजला. कलम २९३ अन्वये आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आज मंगळवारी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde in Legislative Assembly यांनी उत्तर देत असताना विधान भवनाच्या गेटवरच सुभाष देशमुख Farmer suicide Attempted Vidhan Bhavan gate या शेतकऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून त्यांनी आत्महत्या Farmer Suicide Attempted Mantralaya करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो 15 टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या टेरेसवर चढून farmer suicide attempted Mantralaya terrace एका शेतकऱ्याने शोले स्टाईल आंदोलन केले. हे आंदोलन बराच वेळ सुरू होते. त्याच्या विविध मागण्यांसाठी तो टेरेसवर चढला असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे.
चार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न : आज एकंदरीत चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने विधानभवन तसेच मंत्रालय येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. अगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर रॉकेट घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका 88 वर्षीय शेतकऱ्याने पोलिसांना धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर एका शेतकरी महिलेने सुद्धा स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आता या शेतकऱ्याने थेट शोले स्टाईल आंदोलन करत मंत्रालयाचे टेरेस गाठले.
हेही वाचा - Video मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता चढला मंत्रालयाच्या छतावर, अन् झालं असं..