मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून अडीच कोटी रुपयांची ( Gold smuggle by Rajdhani Express ) सोन्याची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिल्ली येथून मुंबईला येणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमधून ( Rajdhani Express ) सोन्याची तस्करी करण्यात येणार असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही ( Borivali station ) कारवाई झाली. आरोपींमधील एका मुख्य आरोपीला तीन दिवसाची डीआरआय कोठडी, तर उर्वरित तीन आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी 10 महिन्यांत 60 ते 70 किलो सोन्याची तस्करी केल्याचे सांगितले. या 4 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. अल्ताफला कोर्टाने 3 दिवसांसाठी डीआरआयच्या कोठडीत, तर उर्वरित तीन आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. हे चौघे परदेशातून तस्करी करून भारतात आणलेले सोने एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून दिल्ली येथून मुंबईला राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमधून आणत होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोरिवली स्टेशनवर पकडले.
डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की, म्यानमार बर्मा येथून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर डीआरआयने त्यांच्यावर नजर ठेवली. हे लोक बोरिवली स्थानकात येताच त्यांना थांबवून पोलिसांनी त्यांच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यांच्याकडे 4.9 किलो सोने सापडले, ज्याची किंमत 2.5 कोटी रुपये इतकरी आहे. अफशान शेख, मोईनुद्दीन मन्सूरी, अल्ताफ मोहम्मद मेमन आणि अदनान रफिक शेख अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की अफशान आणि मोईनुद्दीन यांना म्यानमारमधून सोने भारतात आणण्याचे काम देण्यात आले होते आणि ते सोने घेऊन बोरिवलीला पोहचताच अल्ताफ आणि अदनान त्यांच्याकडून हे सोने घेणार होते. नंतर ते मुंबईतील झवेरी मार्केटमध्ये हे सोने विकणार होते. परदेशातून सोने भारतात आणण्यासाठी अल्ताफ आणि अदनान यांनी अफशान आणि मोईनुद्दीनला प्रत्येक फेरीसाठी 15 हजार रुपये देत होते.
हेही वाचा - Ashadi Ekadashi : एसटी महामंडळातर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, परिवहन मंत्र्यांच्या सूचना