ETV Bharat / city

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले; मुंबईत कोरोनाचे 1275 नवे रुग्ण, 46 रुग्णांचा मृत्यू - update corona news in mumbai

कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. आज मुंबई शहरात कोरोनाचे 1275 नवे रुग्ण आढळून आले.

mumbai
महापालिका
author img

By

Published : Aug 20, 2020, 10:49 PM IST

मुंबई - आज मुंबई शहरात कोरोनाचे 1275 नवे रुग्ण आढळून आले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 32 हजार 817 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 311 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 976 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 07 हजार 033 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 170 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 90 दिवसांवर पोहोचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 35 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 976 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 07 हजार 033 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 32 हजार 817 रुग्ण असून 1 लाख 07 हजार 033 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 311 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 18 हजार 311 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 90 दिवस तर सरासरी दर 0.78 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 570 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 631 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 51 हजार 593 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.